Bangladesh : बांगलादेशात हिंदू समर्थक अर्थशास्त्रज्ञ अबुल बरकत यांना अटक; म्हणाले होते- 2046 पर्यंत देशात एकही हिंदू राहणार नाही

Bangladesh

वृत्तसंस्था

ढाका : Bangladesh शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात प्रसिद्ध बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ अबुल बरकत यांना तुरुंगात पाठवण्यात आले. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री उशिरा २० हून अधिक पोलिसांनी बरकत यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.Bangladesh

बरकत यांनी चार दशके ढाका विद्यापीठात अध्यापन केले आहे. २००९ मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या कारकिर्दीत त्यांना जनता बँकेचे अध्यक्ष बनवण्यात आले. ते हिंदू अल्पसंख्याकांच्या बाजूने बोलण्यासाठी देखील ओळखले जातात. बरकत यांनी कट्टरपंथी इस्लामिक विचारसरणींवर, विशेषतः जमात-ए-इस्लामीसारख्या शक्तींवर उघडपणे टीका केली आहे.

बरकत यांनी २०१६ मध्ये इशारा दिला होता की जर अल्पसंख्याकांवर हल्ले आणि त्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा सुरू राहिला तर पुढील ३० वर्षांत बांगलादेशात एकही हिंदू राहणार नाही. त्यांचे विधान बांगलादेशात खूप लोकप्रिय झाले आणि काही वर्तुळात ते वादग्रस्तही ठरले.



बँकेशी संबंधित २२५ कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण

अबुल बरकतवर त्यांच्या कार्यकाळात रेडिमेड गारमेंट कंपनी ‘अ‍ॅनोनटेक्स ग्रुप’ ला बेकायदेशीर मार्गाने कर्ज मिळविण्यात मदत केल्याचा आणि जनता बँकेतून २.९७ अब्ज टका (सुमारे २२५ कोटी रुपये) गबनवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात बांगलादेश भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (ACC) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास यंत्रणेचा आरोप आहे की बरकतने बनावट कागदपत्रे तयार केली, काल्पनिक इमारती आणि कारखान्यांच्या नावाखाली कर्ज मंजूर केले आणि जाणूनबुजून खरेदी केलेल्या जमिनीची किंमत खूप जास्त दाखवली जेणेकरून त्यांना अधिक कर्ज मिळू शकेल.

या प्रकरणात अबुल बरकतसह एकूण २३ जणांना आरोपी करण्यात आले आहे, ज्यात बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर अतिउर रहमान यांचा समावेश आहे. शुक्रवारी न्यायालयात हजर असताना एसीसीने तीन दिवसांच्या रिमांडची मागणी केली, तर बचाव पक्षाने जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने दोन्ही याचिकांवर अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही आणि तोपर्यंत बरकतला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

बरकत यांनी हिंदूंवरील अत्याचारावर पुस्तक लिहिले

अबुल बरकत यांना २०२२ मध्ये जपानने ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान केला. २०१६ मध्ये बरकत यांनी ‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉर्मिंग अ‍ॅग्रिकल्चरल लँड-वॉटर बॉडीज इन बांगलादेश’ हे पुस्तक लिहिले.

या पुस्तकात त्यांनी असा दावा केला आहे की १९६४ ते २०१३ दरम्यान १.१३ कोटी हिंदूंनी धार्मिक छळामुळे बांगलादेश सोडला. बरकत यांच्या मते, २०१६ मध्ये दररोज ६३२ हिंदू देश सोडून जात होते, म्हणजेच दरवर्षी २,३०, ६१२ हिंदू देश सोडून जात होते. या आधारावर त्यांनी इशारा दिला की जर हे असेच चालू राहिले तर २०४६ पर्यंत बांगलादेशात एकही हिंदू शिल्लक राहणार नाही.

बरकत यांनी त्यांच्या पुस्तकात असेही नमूद केले आहे की सरकारने हिंदूंची ६०% जमीन शत्रूची मालमत्ता म्हणून घोषित करून ती हिसकावून घेतली आहे. प्राध्यापकांनी हे पुस्तक ‘बुनो’ जमातीतील त्यांच्या बालपणीच्या मित्राला समर्पित केले आहे जो आता बेपत्ता आहे.

Bangladesh: Pro-Hindu Economist Abul Barkat Arrested

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात