विशेष प्रतिनिधी
ढाका : दुर्गामाता उत्सवा दरम्यान बांग्लादेशमधील काही हिंदू मंदिरांवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेमध्ये चार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुन्हेगारांना निश्चितच शिक्षा दिली जाईल असा शब्द दिला होता. ह्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा बांग्लादेशमधील इस्कॉन टेंपलमधले 200 पेक्षा जास्त लोकांच्या जमावा कडून हल्ला करण्यात आला. आणि ह्या हल्ल्यामध्ये मंदिरातील एका सदस्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेह मंदिरा शेजारील तळ्यात आढळून आला होता.
Bangladesh is a secular nation and everyone has every right to practice their faith here: Bangladesh Information and Broadcasting Minister Murad Hasan
या घटनेनंतर धार्मिक कट्टरतावाद वाढू लागला आहे अशी टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशचे माहिती व प्रसारणमंत्री मुराद हसन यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. विशेषतः धार्मिक कट्टरतेचा तीव्र आक्षेप घेत त्यांनी इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही अशी भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशाने पुन्हा 1972 च्या राज्यघटनेनुसार राज्यभर कारभार करण्याची गरज आहे. असे देखील त्यांनी वक्तव्य केले आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर पुन्हा हल्ला, जमात-ए-इस्लामीच्या लोकांनी हिंदूंच्या 65 घरांना लावली आग, मंदिराचीही तोडफोड
मुराद हसून पुढे म्हणाले की, बांगलादेशाची भूमी धार्मिक कट्टरता वाद्यांसाठी खुलं मैदान होऊ शकत नाही. आमच्यामध्ये देशासाठी लढा दिलेल्या स्वातंत्र योद्ध्यांचे रक्त आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा 1972 च्या राज्यघटनेत परत जावे लागणार आहे. आणि या संदर्भामध्ये मी संसदेमध्ये देखील आपले मत मांडणार आहे. आणि कोणी याविरुध्द काही बोलले तर त्याच्याविरुद्धही मी परखड पणे बोलेन. असे देखील त्यांनी ठामपणे सांगितले आहे. बांग्लादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि इथे प्रत्येकाला आपली श्रद्धा जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे असे देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
बांगलादेशमध्ये घडलेल्या घटनेनंतर लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये. असे आवाहन करणारी तातडीची सूचना धार्मिक व्यवहार मंत्रालयाने जारी केली होती. धार्मिक ऐक्य व शांतता कायम राखण्यासाठी त्यांनी आव्हान देखील केले आहे. भारत सरकारकडून ही या घटनेची तीव्र शब्दांमध्ये निंदा करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App