विशेष प्रतिनिधी
चितगाव : पवित्र कुराणाचा अपमान केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने बांगला देशात हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सरकारने हिंसाचारग्रस्त 22 जिल्ह्यात लष्कर तैनात केले आहे.Attacks on Hindu temples in Bangladesh, violence in 22 districts, army deployed
कुराणाचा अपमान केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यावर जमावाने हिंदूंच्या घरांवर, दुकानांवर आणि मंदिरांवर हल्ले सुरू केले. हिंसाचाराच्या घटनांनंतर देशात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे की हिंसाचारात सामील असणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. कोणत्याही धर्माची व्यक्ती असेल तरी कारवाई केली जाईल. गुरुवारी बांग्ला देशात दुर्गा पूजेचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेख हसीना यांनी ढाका येथील का पर्व मनाया गया। इस दौरान हसीना ने ढाकेश्वरी मंदिरात हिंदू नागरिकांची भेट घेतली.
हिंसाचार पूर्वनियोजित होता असे सांगण्यात येत आहे.त्यासाठी सोशल मीडियावर पध्दतशिरपणे अफवा पसरविण्यात आल्या.चांदपूर परिसरात अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याठिकाणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी धार्मिक मंत्रालयाने जरी निवेदनात म्हटले आहे की त्यांना सूचना मिळाली होती की कोमिला येथे इस्लाम धर्माचा पवित्र ग्रँथ कुराणाचा अपमान करण्यात आला.
चितगाव येथील कोमिला परिसरात दुर्गा पूजेच्या मंडपावर हल्ला करण्यात आला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या 10 हुन अधिक असू शकते. चितगाव येथील एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार हिंदूंच्या घरे, दुकानांवरही हल्ले कऱण्यात आले.त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App