वृत्तसंस्था
रियाध : Gaza अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, गाझाचे टेकओव्हर करून त्यास ‘मध्यपूर्वेतील रिव्हेरा’च्या रूपात विकसित करू. सुमारे २३ लाखांहून जास्त गाझावासीय निर्वासित होण्यापासून वाचण्यासाठी आखाती सहकार्य परिषदेतील सर्व ६ सदस्य देश सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये एकत्र आले आहेत.Gaza
अरब नेते इजिप्त आणि जॉर्डनसोबत मिळून एक पर्यायी योजनेवर विचार करत आहेत. इजिप्तच्या योजनेत २३ लाख पॅलेस्टिनींच्या ‘बलपूर्वक निर्वासना’चा समावेश असेल. त्या बदल्यात अरब देश गाझाच्या पुनर्विकासासाठी पैसा उपलब्ध करण्यास तयार आहेत. या बैठकीनंतर तयार केलेल्या मसुद्याला सौदीची राजधानी रियाधमध्ये ४ मार्चला इजिप्तमध्ये होणाऱ्या अरब लीग शिखर परिषदेदरम्यान गाझा संकटावरील उपायाच्या रूपात सादर केले जाईल आणि त्यावर सहमती बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.
दुसरीकडे, मध्यपूर्वेत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ म्हणाले, गाझासाठी राष्ट्राध्यक्षांची योजना पॅलेस्टिनींना बेदखल करण्यासंदर्भात नाही. कारण, पॅलेस्टिनी लोकांसाठी शक्यतांमध्ये सुधारणा आणण्याबाबत आहे.
पहिल्या टप्प्यात सर्व ढिगारा काढणार
इजिप्तचे माजी मुत्सद्दी मोहंमद हेगजी यांनी ३ ते ५ वर्षांच्या अवधीत ३ तांत्रिक टप्प्यांत गाझाच्या पुनर्विकासाची रूपरेषा तयार केली आहे. या योजनेचा पहिला टप्पा ६ महिन्यांपर्यंत चालेल. त्यात त्वरीत सुधारणा आणि ढिगारा काढण्यावर केंद्रीत असेल. दुसऱ्या टप्प्यात घरांचे बांधकाम आणि शहरी नियोजनावर केंद्रीत असेल. तिसऱ्या टप्प्यात इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष समाप्त करण्याच्या उपायावर असेल.
इस्रायल :३ बसमध्ये स्फोट, अतिरेकी हल्ल्याची शक्यता
इस्रायलच्या तेल अवीवच्या उपनगरीय भागात बॅट याम आणि होलोनमध्ये तीन रिकाम्या बसमध्ये स्फोट झाला. या घटनेकडे संशयित अतिरेकी हल्ल्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे. कोणतीही जीवित हानी झाली नाही. पोलिसांनी दोन अन्य बॉम्ब निष्क्रिय केले. पंतप्रधान नेतन्याहू यांनी पश्चिम किनाऱ्यावर दहशतवादी केंद्रांविरुद्ध अभियानाचे आदेश दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App