पुन्हा एकदा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर प्रश्नचिन्ह
विशेष प्रतिनिधी
ढाका : Bangladesh बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) नेते मोहम्मद बाबुल मिया यांची शुक्रवारी दुपारी मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने पुन्हा एकदा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यावर अराजकता नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शुक्रवारी दुपारी ढाक्यातील धामराय उपजिल्हा येथे ही दुर्दैवी घटना घडली.Bangladesh
बाबुल यांची पत्नी यास्मिन बेगम म्हणाल्या की, हल्लेखोरांनी त्यांना काठ्या आणि पाईपने मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांचे दोन्ही डोळेही फोडण्यात आले. जेव्हा मी आणि काही स्थानिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्हाला अडवले आणि ते बेशुद्ध झाल्यानंतरच हल्लेखोर तिथून निघून गेले.
काही जणांचा असा दावा आहे की मृत बाबुल यांचा हल्लेखोरांशी तलावाच्या मालकीवरून वाद झाला होता, जो त्यांच्या हत्येचे कारण असू शकतो. हल्ल्यानंतर बाबुल यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, डोक्याला, डोळ्यांना, चेहऱ्याला आणि पायांना गंभीर दुखापत झाली होती.
काही दिवसांपूर्वीच बीएनपीचे वरिष्ठ नेते शमसुझ्झमान दुडू यांनी अंतरिम सरकारवर आरोप केले होते आणि म्हटले होते की अंतरिम सरकारच्या काळात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते मारले गेले आहेत. दोषींना कोणताही विलंब न करता पकडले गेल पाहीजे. अन्यथा लोकांमध्ये आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App