इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात अराजकाच्या ज्वालामुखीचा उद्रेक; देशात सर्वत्र हिंसाचार आणि जाळपोळ!!

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानात माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ पार्टीचा प्रमुख इम्रान खान याला अल कादरी ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात अराजकाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद पेशावर पासून अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये इम्रान खानचे समर्थक भडकून नुसते रस्त्यावरच आले आहेत असे नाही, तर हजारोंच्या संख्येने इम्रान समर्थक लष्करी अधिकाऱ्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानांमध्ये घुसले आहेत. यातून पाकिस्तानात पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे सरकार कोसळण्याची स्थिती निर्माण झाली असून लवकरच लष्कर देखील छावणीतून बाहेर पडून संपूर्ण देश ताब्यात घेण्याची भीती निर्माण झाली आहे. After former Pakistan PM Imran Khan’s arrest, protesters in Pakistan have entered compounds of army commanders’ residence in Lahore

पाकिस्तानला लष्करी राजवट नवीन नाही. लष्करी रणगाडे पाकिस्तानच्या शहरांमधून नागरी स्वातंत्र्याच्या चिंधड्या उडवत फिरणे ही सर्वसामान्य बाब आहे. इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानच्या सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून इमरान समर्थकांच्या झुंडी पाकिस्तान लष्करी अधिकाऱ्यांच्या घरात आणि कार्यालयांमध्ये घुसून तोडफोड जाळपोळ करत सुटले आहेत. त्यामुळे शहाबाज शरीफ सरकारला आता पाकिस्तानातील कायदा सुव्यवस्था राखणे कठीण झाले आहे आणि याचाच फायदा घेत आता पाकिस्तानात लष्कराचे बंड देखील अटळ झाले आहे.

इम्रान खान याला अल कादरी ट्रस्टमध्ये अपहर केल्याबद्दल इस्लामाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार पाकिस्तानी रेंजर्स अटक केली. त्यानंतर इमरान खानच्या पक्षाने देशव्यापी हरताळची घोषणा केली. ही घोषणा करून काही तास उलटून गेले नाहीत, तोच देशातली अराजकतत्वे बाहेर आली आणि त्यांनी संपूर्ण पाकिस्तानात हैदोस घालायला सुरुवात केली.

पाकिस्तानची सर्वसामान्य जनता आधीच आकाशाला भिडलेल्या महागाईने होरपळली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती शेकडो टक्क्यांनी वाढले आहेत. त्यात आता इम्रान समर्थकांचा धुडघूस आणि तो चिरडायला पाकिस्तानी लष्कर देणार असलेले प्रत्युत्तर यांची भर पडली आहे.

After former Pakistan PM Imran Khan’s arrest, protesters in Pakistan have entered compounds of army commanders’ residence in Lahore

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात