नाशिक : अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुक्तकी भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये निखार आला. दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करार झाले त्यामुळे पाकिस्तान चिडला आणि त्यांच्या भारतातल्या ecosystem ने अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना बोलावले नाही हा विषय उकरून काढला परंतु आज अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुक्तकी यांनी स्वतःच हा विषय एका झटक्यात मिटवून टाकला. नवी दिल्लीत त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना निमंत्रित केले आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. त्यांनी पाकिस्तानला चांगलेच ठोकून काढले. त्यामुळे पाकिस्तान आणि गांधी बहीण भाऊ तोंडावर आपटले. Amir Khan Muttaqi
– महत्त्वाचे करार
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दीर्घ दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातले संबंध अधिक दृढ झाले. भारताने अफगाणिस्तानात दूतावास पुन्हा उघडण्याची घोषणा केली. त्याचवेळी अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात व्यापार, खनिज उत्पादन वगैरे सारखे महत्त्वपूर्ण करार झाले. सुधारलेल्या तालिबानी राजवटीत अफगाणिस्तानने भारताशी संबंध सुधारले. पण त्यामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानची भारतातली इकोसिस्टीम अस्वस्थ झाली म्हणूनच अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना बोलविले नसल्याचा मुद्दा त्यांनी उकरून काढला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही महिला पत्रकारांचा अपमान सहन केलाच कसा??, असा सवाल करून त्यांना घेरले. परंतु भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यासंदर्भातला सविस्तर खुलासा करून अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेशी भारत सरकारचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला.
– महिला पत्रकारांना निमंत्रण
पण त्या पलीकडे जाऊन अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना बोलाविले. अमीर खान मुक्तकी यांनी महिला पत्रकारांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीच्या पत्रकार परिषदेत महिला नसल्याबद्दल खुलासा केला. अतिशय कमी वेळेत ती पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यामुळे सर्वांना निमंत्रण देणे शक्य नव्हते परंतु आज सगळ्यांना निमंत्रणे गेली आणि महिला पत्रकार सुद्धा पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत असे त्यांनी आवर्जून सांगितले.
– पाकिस्तानला ठोकले
मात्र त्याच वेळी अमीर खान मुक्तकी यांनी आपल्या पत्रकार परिषदेतल्या मूळ अजेंडा बाजूला ठेवला नाही. उलट त्यांनी तो महिला पत्रकारांसमोर सुद्धा जोरकसपणे मांडला. त्यांनी पाकिस्तानला जोरदार ठोकून काढले. पाकिस्तानी जनतेशी किंवा तिथल्या राजकीय व्यवस्थेशी अफगाणिस्तानचे भांडण नाही. पाकिस्तानी लष्कर अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसखोरी करते त्याला आम्ही ठाम विरोध करू. पाकिस्तानच्या कुठल्याही कुरापतीला चोख प्रत्युत्तर देऊ. अफगाणिस्तानने महासत्तांना हरविले. आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे, असा इशारा अमीर खान मुक्तकी यांनी दिला. अफगाणिस्तान – पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाचा त्यांनी संदर्भ दिला पाकिस्तानी सैन्याने अफगाण सीमेच्या आत प्रवेश केला, त्यावेळी अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानला धुतले, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले.
– अफगाणिस्तानातली अंतर्गत परिस्थिती
अफगाणिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीबद्दल सुद्धा त्यांनी व्यवस्थित माहिती दिली. तालिबान राजवट येण्यापूर्वी तिथे जे सरकारी अधिकारी कर्मचारी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लोक काम करत होते ते जसेच्या तसे तालिबानी राजवटीत सुद्धा काम करत आहेत. त्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे. तिथे कोणताही भेदभाव नाही, असा स्पष्ट खुलासा असा अमीर खान मुक्तकी यांनी केला.
– पापड मोडला
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्री यांच्या त्या पत्रकार परिषदेतल्या वातावरणामुळे गांधी बहीण – भावाचा पापड मोडला. त्याचबरोबर पाकिस्तानने “सरळ” झाला. कारण पहिल्या पत्रकार परिषदेतल्या महिलांच्या अनुपस्थितीचा विषय पाकिस्तान आणि गांधी बहीण – भाऊ यांना जसा हवा तसा तापलाच नाही. उलट अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तो एका झटक्यात विझवून टाकला. त्यामुळे त्या विषयाची आंच नरेंद्र मोदींपर्यंत येऊन पोहोचू शकली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App