वृत्तसंस्था
लाहोर : पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली. इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे वकील फैसल चौधरी यांनी इम्रान खान यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याचवेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाकिस्तानात विविध शहरांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी दिली आहे. A Political Earthquake in Pakistan; Former Prime Minister Imran Khan arrested
अल कादिर ट्रस्ट केसमध्ये इम्रान खान यांना अटक झाली आहे. पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या पक्षाचे समर्थक संतप्त झाले आहेत. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशभर विरोध प्रदर्शने सुरू केली आहेत.
अल् कादिरा ट्रस्ट केस प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाल्याचं इस्लामाबादच्या आयजींनी सांगितलं. सध्या परिस्थिती सामान्य आहे. कलम 144 लागू करण्यात आलं आहे, असं आयजींनी सांगितलं. कोणी नियमांच उल्लंघन केले, तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रमुखांनी दिला म्हणाले.
#WATCH लाहौर: पीटीआई प्रमुख इमरान खान की गिरफ्तारी के बाद पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) के समर्थकों ने विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/949LUQbpFV — ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2023
#WATCH लाहौर: पीटीआई प्रमुख इमरान खान की गिरफ्तारी के बाद पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) के समर्थकों ने विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/949LUQbpFV
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2023
‘ते खान साहेबांना मारत असतील’
पाकिस्तानातील तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या मुसरत चीला म्हणाल्या की, “इम्रान खान यांचा छळ सुरू आहे. ते खान साहेबांना मारत असतील. ते खान साहेबांबरोबर काहीही करू शकतात.
इमरान खान यांना अटक करताना पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली त्यात इमरान खान यांचे वकील देखील जखमी झाले असा दावा करणारी ट्विट पीटीआयच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन केले आहे.
पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी लोकांना घराबाहेर पडण्याची चिथावणी दिली आहे. इस्लामाबाद हायकोर्टात हल्ला झालाय. इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची अटक ही न्यायिक व्यवस्था बंद करण्यासारख आहे. फवाद चौधरी यांनी टि्वटमध्ये म्हटलय की, “हायकोर्टाला रेंजर्सनी घेरले. वकिलांना त्रास दिला. इम्रान खान यांच्या कारला चारही बाजूंनी घेरण्यात आले.
इम्रान खान यांच अपहरण
कोर्टाबाहेरून इम्रान खान यांचे अपहरण केल्याचा दावा पीटीआय नेते अजहर मशवानी यांनी केला. तात्काळ प्रभावाने पक्ष संपूर्ण देशात आंदोलन करेल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App