पाच जणांचा मृत्यू; सहा जण गंभीर जखमी
विशेष प्रतिनिधी
United States अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी (FSU) मध्ये गुरुवारी झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. ऑर्लँडोस्थित वृत्तवाहिनी WFTV9 ने सूत्रांच्या हवाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.United States
दोन जणांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांपैकी एक मारला गेला आहे आणि दुसरा ताब्यात आहे. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी या गोळीबाराच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) चे संचालक काश पटेल यांनी पोस्ट केले की, “एफबीआयचे पथक मदत करण्यासाठी घटनास्थळी आहे.” आवश्यकतेनुसार आम्ही स्थानिक एजन्सींना पूर्ण मदत करू. अमेरिकेत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. २०१८ मध्ये, फ्लोरिडा हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात १७ विद्यार्थी आणि कर्मचारी ठार झाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App