विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे अध्यात्मिक आकर्षण असलेल्यांकडून भारतीय वस्तूंना मोठी मागणी असते. याचाच फायदा घेऊन न्यूझीलंडमधील एका वेबसाईटने चारपाईची पारंपरिक भारतीय बेड म्हणून चक्क ४१,५०० रुपयांना विक्री सुरू केली आहे.
न्यूझीलंडमधील एका फर्निचर ब्रॅण्डने व्हिंजेट प्रोडक्टच्या नावाखाली भारतामध्ये चारपाई नावाने ओळखली जाणारी खाट विक्रीसाठी काढली आहे. अॅनाबेल्स या फर्निचरच्या दुकानाने व्हिंटेज इंडियन डेबेडह् या नावाने ही खाट विकायला काढली आहे. भारतामध्ये चार पायांवर वेल्डींगने जोडलेल्या चौकोनी लोखंडी ढाच्यावर जाड पट्या बांधून तयार केल्या जाणाऱ्या चारपाईवर केवळ एक पांढरी चादर टाकून त्याला आलिशान लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या चारपाईची किंमत ४१,५०० रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये मिळणाऱ्या खाटेच्या किंमतीच्या शंभर पट ही किंमत आहे.
अॅनाबेल्स या कंपनीने ही खाट एकदम वेगळी आणि ओरिजनल क्रिएशन असल्याचं सांगत ती ८०० न्यूझीलंड डॉलर्सला म्हणजेच ४१ हजार २११ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. भारतामध्ये कोणत्याही लोकल बाजारापेठेमध्ये दरामध्ये नीट घासाघीस केल्यास अगदी ४०० रुपयांपासून ही खाट उपलब्ध होते.
या बेडची किंमत ही १२०० न्यूझीलंड डॉलर्स म्हणजे ६१ हजार रुपये असल्याचं सांगून विशेष सूट म्हणून तो ४१ हजारांना उपलब्ध असल्याचं या वेबसाईटवर दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडमध्ये ४१ हजारांना चारपाई विकणाºया या कंपनीने भारतामधूनच या चारपाई नेल्या आहेत. केवळ खाटच नाही तर अनेक गोष्टी या कंपनीने भारतीय बनावटीच्या व्हिंटेज या नावाखाली विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांची खरेदीही होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App