पाकिस्तानी विद्यापीठात विद्यार्थिनींच्या 5500 पॉर्न क्लिप व्हायरल, सुरक्षा अधिकारी शूट करायचे, प्रोफेसर ड्रग्ज विकायचे


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील इस्लामिया विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या मोबाइल फोनवरून महिला विद्यार्थिनींच्या अश्लील व्हिडिओ क्लिप सापडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये या व्हिडिओंची संख्या सुमारे 5500 असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपी विद्यार्थिनींना चांगल्या मार्कांचे आमिष दाखवून त्यांचे विवस्त्र व्हिडिओ बनवत असत. या विद्यापीठातील 113 विद्यार्थिनी अंमली पदार्थांच्या आहारीही गेल्या आहेत. विद्यापीठातील एक प्राध्यापक त्यांना ड्रग्ज विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.5500 porn clips of female students go viral in Pakistani university, security officers used to shoot, professors sell drugs

पोलिसांनी विद्यापीठाचे संचालक डॉ. अबुझर, सुरक्षा अधिकारी सय्यद एजाज शाह आणि अल्ताफ नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांना एजाजच्या 2 फोनमधून या पॉर्न क्लिप मिळाल्या आहेत.पोलिसांनी 22 जुलै रोजी विद्यापीठावर छापा टाकला होता. हे संस्था आणि विद्यार्थ्यांविरोधातील षडयंत्र असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याचवेळी पोलिसांचे म्हणणे आहे की, विद्यापीठ हे आमचे टार्गेट नाही, आम्हाला ड्रग्ज तस्करांना पकडायचे आहे.

न्यूड व्हिडिओ प्रकरणात सुरक्षा अधिकाऱ्यासह विद्यापीठातील इतर प्राध्यापक आणि कर्मचारीही सामील आहेत, ज्यांनी विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून हा व्हिडिओ एजाजला पाठवण्यास सांगितले.

डान्स आणि सेक्स पार्टीसाठी विद्यार्थिनींना बळजबरी

विद्यापीठात डान्स आणि सेक्स पार्ट्यांसाठी विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांनाही जबरदस्ती करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दक्षिण पंजाबचा शिक्षण विभागही या प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्याचा तपास अहवाल तीन दिवसांत सादर केला जाणार आहे.

आरोपी एजाज आर्मीचा निवृत्त अधिकारी

पोलिसांनी सांगितले की, आरोपी एजाज हा निवृत्त लष्करी अधिकारी आहे. त्याची नियुक्ती विद्यापीठाचे माजी कुलगुरूंनी केली होती

दोन अंमली पदार्थ तस्कर पकडले

पोलिसांनी एका महिलेसह 2 ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून 1.5 किलो चरस, 20 ग्रॅम क्रिस्टल आणि 300 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी शैक्षणिक संस्थेत अमली पदार्थांचा पुरवठा करायचे.

5500 porn clips of female students go viral in Pakistani university, security officers used to shoot, professors sell drugs

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात