स्फोटक अफगणिस्तानमधून ४०० भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका, भारताच्या भूमीत आल्याचा आनंद

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमधील भारतीय नागरिकांसह आश्रय मागतील त्यांना परत सुखरूप आणण्याची ग्वाही मोदी सरकारने दिली आहे. त्यानुसार पहिल्या विमानाद्वारे १६८ जणांना भारताच्या भूमीत आणण्यात आले. यात १०७  भारतीय, २३ अफगाणी शीख आणि हिंदू यांचा समावेश होता. अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंग खालसा यांनाही भारतात आणण्यात आले आहे.  400 indin came from Afghanistan to india

एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाद्वारे ८७ भारतीय आणि दोन नेपाळी नागरिकांना दुशांबेहून आणण्यात आले. या सर्वांना काबूलहून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



आणखी एका विमानाद्वारे १३५ नागरिकांना भारतात आणण्यात आले. त्यांना गेल्या दोन-तीन दिवसांत काबूलहून कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका आणि ‘नाटो’च्या विमानांद्वारे नेण्यात आले होते. तेथून आता त्यांना विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले.

भारताने आश्रय दिल्याबद्दल सर्व अफगाण नागरिकांनी भारताचे आभार मानले आहेत. एक अफगाण महिला भारताला धन्यवाद देताना म्हणाली, ‘‘तालिबानी लोकांनी आमची घरे उद्ध्वणस्त केली, तिथे आमच्या मदतीसाठी भारतीय बांधव पुढे आले, ही मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही.’’

400 indin came from Afghanistan to india

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात