पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या ३०० भारतीयांची सुटका होणार!


 इस्लामाबादने भारताला पाठवली कैद्यांची यादी

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानने शनिवारी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना आपल्या तुरुंगात बंद असलेल्या 42 नागरिक आणि 266 मच्छिमारांसह 308 भारतीय कैद्यांची यादी सुपूर्द केली. 2008 च्या द्विपक्षीय करारानुसार पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र कार्यालयाने (एफओ) या प्रकरणाची पडताळणी केली आहे. 300 Indians locked up in Pakistani jails will be released

भारताला 308 भारतीय कैद्यांची यादी मिळाली –

भारतीय परराष्ट्र कार्यालयाकडून अशी माहिती देण्यात आली की, पाकिस्तान सरकारने आज इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या 308 भारतीय कैद्यांची यादी सुपूर्द केली आहे. त्याचवेळी, भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांना भारतीय तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी कैद्यांची यादी सुपूर्द केली आहे. या यादीनुसार, एकूण 417 पाकिस्तानी नागरिक भारतीय तुरुंगात आहेत, त्यापैकी 343 नागरी कैदी आणि 74 मच्छिमार आहेत.

याशिवाय, ज्यांनी आपली पूर्ण शिक्षा भोगली आहे अशा सर्व पाकिस्तानी नागरीक कैदी आणि मच्छिमारांची सुटका करून त्यांना परत पाठवण्याची विनंती पाकिस्तान सरकारने भारताला केली आहेक. भारत आणि पाकिस्तान वेळोवेळी सागरी सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल एकमेकांच्या हद्दीत घुसणाऱ्या मच्छिमारांना अटक करत असल्याची माहिती आहे.

300 Indians locked up in Pakistani jails will be released

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात