वृत्तसंस्था
गुडौरी : Georgia restaurant जॉर्जियातील गुडौरी येथील स्की रिसॉर्टमध्ये सोमवारी 11 भारतीयांसह 12 जणांचा मृत्यू झाला. 12वी व्यक्ती जॉर्जियाची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण रिसॉर्टच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत झोपले होते. कार्बन मोनॉक्साईड गळतीमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.Georgia restaurant
पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या किंवा जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाही. जॉर्जियाची राजधानी त्बिलिसी येथे असलेल्या भारतीय दूतावासाने या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने सांगितले की, ‘ मृतदेह लवकर भारतात पाठवता यावेत, यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत.’
Embassy of India in Georgia issues a statement on the death of 11 Indian Nationals in Gudauri, Georgia. pic.twitter.com/iuUZuPADEu — ANI (@ANI) December 16, 2024
Embassy of India in Georgia issues a statement on the death of 11 Indian Nationals in Gudauri, Georgia. pic.twitter.com/iuUZuPADEu
— ANI (@ANI) December 16, 2024
जॉर्जियाचे गृह मंत्रालयाने या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सीएनएननुसार, कामगारांच्या बेडजवळ एक जनरेटर सापडला होता. कदाचित वीज गेल्यानंतर तो चालू करण्यात आला. त्यातूनच वायुची गळती झाली. मृतांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही.
सध्या गुडौरी येथे रात्रीच्या वेळी तापमान उणे 15 अंशापर्यंत जाते. हीटरशिवाय येथे रात्र घालवणे जीवघेणे ठरू शकते. यामुळेच येथे राहणारे लोक खोलीत उष्णतेची व्यवस्था करतात.
गुडौरी हे रशियन सीमेजवळ काकेशस पर्वतरांगांच्या जवळ आहे. हे देशातील सर्वात मोठे आणि सर्वोच्च स्की रिसॉर्ट आहे. येथे प्रामुख्याने युरोपियन पर्यटक येतात. अहवालानुसार, गेल्या वर्षी येथे 3 लाखांहून अधिक लोक स्कीइंगसाठी आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App