कोरोनामुळे जागतिक मंदीची भीती : आनंद महिंद्रा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना फैलावाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसेल. उत्पादन क्षेत्रावर त्याचा दूरगामी परिणाम होणार असल्याने नजीकच्या भविष्यात जागतिक मंदीचा सामना करावा लागेल, असे मत प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.                                                  पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विरोधातील संघर्षाला युद्ध असे म्हटले आहे. ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे सांगून महिंद्रा म्हणाले, “दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर जगभर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. युरोप उद्धवस्त झाला होता. जागतिक मंदीची जबरदस्त लाट आली होती. त्यात समाजजीवन होरपळून गेले होते. आजही तशी परिस्थिती कोरोना फैलावामुळे निर्माण होते आहे.

Situation in India: The total number of positive cases of #COVID19 in India now stands at 258 (including 39 foreigners), 4 deaths (1 each) in Delhi, Karnataka, Punjab and Maharashtra:.

सर्व क्षेत्रातील उत्पादन घटल्याचा फटका संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसेल.” दुसर्‍या महायुद्धानंतरची मंदी १९७५ पर्यंत टिकली होती. कोरोना नंतरची मंदी कदाचित दीर्घकाळ टिकेल. त्याचा रोजगारावर दुष्परिणाम दिसेल. मध्यम वर्ग, गरीब वर्ग यांना बसणारा आर्थिक फटका मोठा असेल. अमेरिकेने त्यावेळी नवीन औद्योगिक धोरण राबवून जागतिक अर्थव्यवस्थेत चैतन्य आणले होते. तसेच प्रयत्न भविष्यात भारतासह सर्व देशांना करावे लागतील. भारतीय अर्थव्यवस्थेत जान आणण्यासाठी धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन करावे लागेल. हे परिवर्तन दीर्घकाळासाठी राबवावे लागेल, असे महिंद्रा यांनी स्पष्ट केले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात