कॉंग्रेसच्या अनेक ब्राह्मणांनी केले देशाचे नेतृत्त्व; सार्वत्रिक टीकेनंतर मंत्री नितीन राऊत यांची सारवासारव


संविधानाची शपथ घेऊन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेल्या नितीन राऊत यांनी जातीवाचक  टीका करावी का, हा औचित्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. राऊत यांच्या विरोधात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र मंत्रीपदी असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने तारतम्य सोडावे का, या संदर्भात राऊत यांच्या कॉंग्रेस पक्षाने या मुद्द्यावरची चुप्पी अजून सोडलेली नाही.


विशेष प्रतिनिधी 
नागपुर :  कॉंग्रेस पक्षातर्फे अनेक नेत्यांनी देशाचे नेतृत्त्व केले, त्यात अनेक ब्राह्मण होते आणि आहेत. पुरोगामी विचारधारा रुजविण्यासाठी अनेक ब्राह्मण नेते अग्रेसर होते त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असा खुलासा महाराष्ट्राचे उर्जामंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.
नागरिकत्व कायद्यासंदर्भात नागपुरात झालेल्या सभेत केलेल्या वक्तव्यावरुन राऊत अडचणीत आले आहेत. “आणि हे लेकाचे जे स्वतः बाहेरुन आले ते बामन आम्हाला सांगतील का,” असे राऊत म्हणाले होते. या जातीवाचक वक्तव्यानंतर राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्राच्या विविध भागातून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षानेही नागपुरातील जरीपटका पोलिस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात तक्रार नोंदवली
आहे.
बाहेरुन आलेले ‘ब्राह्मण राहुल गांधी’ही
राऊतांना शिकवतात अक्कल?

सन 2018 मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतः काश्मिरी ब्राह्मण असून आपले गोत्र दत्तात्रेय असल्याचे सांगितल्याने कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधीही चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. त्यामुळे राऊत यांनी नुकत्याच केलेल्या विधानाचा रोख नेमका कोणत्या ब्राह्मणांकडे आहे, याबद्दल उलटसुलट चर्चा चालू झाली आहे.राऊत यांनी या संदर्भात म्हटले आहे, की कॉंग्रेस पक्ष ब्राह्मण नव्हे तर चातुर्वर्ण्य आणि मनुवाद मानणाऱ्या ब्राह्मण्यवादी विचारांचा विरोध करतो. मी याच उद्देशाने वक्तव्य केले होते. त्यातील रोख हा मनुवाद पाळणाऱ्या संघाकडे होता. त्यात ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा यत्किंचितही उद्देश नव्हता.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या राऊत यांनी जातीवाचक टिप्पणी करावी का, या औचित्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाने रविवारी राऊत यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या शिवाय, व्यक्तीगत स्तरावर तसेच ब्राह्मण संघटनांकडूनही राज्यात अनेक ठिकाणी राऊत यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. राहुल गांधी यांच्या ‘जनेऊधारी ब्राह्मण’ असल्याच्या वक्तव्याचे दाखले देत सोशल मीडियातूनही राऊत यांच्यावर टीका सुरु झाली आहे. त्यानंतर रविवारी उशीरा राऊत यांनी स्वतःच्या वक्तव्यासंदर्भात खुलासा केला.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात