जिंदगी ना मिलेगी दोबारा कास्ट दिसणार फरहान अखतरच्या आगामी ‘जी ले जरा’ सिनेमात?

विशेष प्रतिनिधी

मुबंई : जेव्हा पासून फरहाण अखतर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या सिनेमाची घोषणा झाली आहे. तेव्हापासून आपल्याला सर्वांना एकच उत्सुकता आहे. ती म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातील कास्ट पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसावी. ‘जी ले जरा’ हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट या तिघी या सिनेमात प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

Zindagi Na Milegi Dobara cast will be seen together again in Farhan Akhtar’s upcoming movie ‘Ji Le Zara’?

व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन? असे म्हणत या तिघी सिनेमात एका रोड ट्रिपवर जाणार आहेत. रोड ट्रिप्स हा फरहान अख्तरच्या सिनेमांचा एक मुख्य विषय आहे. करियरच्या सुरवातिला त्याने दिग्दर्शित केलेला ‘दिल चाहता है’ हा सिनेमादेखील रोड ट्रिपवर आधारित होता. जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमादेखील रोड ट्रिपवर आधारित होता. आता जी ले जरा ह्या सिनेमात फक्त मुली रोड ट्रिपवर जातील. आणि त्यांचे अनुभव, त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या घटना यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. असे झोया अख्तर हिने सांगितले आहे.


लक्ष्मीपूजनाचे फोटो शेअर केले म्हणून फरहान अख्तर झाला ट्रोल, आता करणार ट्रोलर्स विरुद्ध कायदेशीर कारवाई


तर झोया अखतर दिगदर्शीत जिंदगी ना मिलेगी दोबाराच्या चाहत्यांची सुप्त इच्छा देखील आता पूर्ण होणार आहे. जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमातील कास्ट म्हणजेच हृतिक रोशन, फरहान अख्तर अभय देओल, कल्की कोचेन हे जी ले जरा या सिनेमामध्ये कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहेत.

Zindagi Na Milegi Dobara cast will be seen together again in Farhan Akhtar’s upcoming movie ‘Ji Le Zara’?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात