विशेष प्रतिनिधी
मुबंई : लई भारी फेम अॅक्टर रितेश देशमुख इंस्टाग्रामवर बराच सक्रिय असतो. आपली बायको जेनेलियासोबत तो बरेच विनोदी व्हिडिओ बनवून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्या दोघांचे व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही क्षणांच्या अवधीतच व्हायरल होताना दिसून येतात. नुकताच रितेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक विनोदी पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने मिठाईचे वाढलेल्या किंमती लिहिल्या होत्या. वाढत्या मिठाईच्या दरासोबत वजनदेखील वाढते आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी पुन्हा पैसे खर्च करावे लागतात. अशा आशयाची ती पोस्ट होती.
I thought I should warn you !!!! pic.twitter.com/ptbJtYHAvC — Riteish Deshmukh (@Riteishd) October 21, 2021
I thought I should warn you !!!! pic.twitter.com/ptbJtYHAvC
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 21, 2021
Why knowledge only during Hindu festivals? How did Riteish Deshmukh answer this question of netizens?
या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले, ‘तुम्ही फक्त सनातनी सण असतात तेव्हा ज्ञान देता का? ईद किंवा ख्रिसमस किंवा नवीन वर्ष त्यादिवशी तुम्ही तोंडात दही गोळा करतात.’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली हाेती. या नेटकऱ्यांच्या प्रश्नावर रितेशने अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. ‘सॉरी सर, मी व्हिगन आहे. मी दही खात नाही. असे उत्तर रितेशने दिले आहे.
Sorry sir – मैं Vegan हूँ । दही नहीं खाता। https://t.co/v3wPJiea30 — Riteish Deshmukh (@Riteishd) October 21, 2021
Sorry sir – मैं Vegan हूँ । दही नहीं खाता। https://t.co/v3wPJiea30
कॉँग्रेसचा नेत्यांवर भरोसा नाय, महापौरपदासाठी हवे रितेश देशमुख, सोनू सूदचे नाव
रितेशने दिलेल्या ह्या प्रश्नावर बरेच लोक खूश होऊन त्याला कमेंटच्या लाईक करत आहेत. तर बरेच लोक रितेशला ट्रोल करतानाही दिसून येत आहेत. रितेश सध्या पिंच 2 आणि काकुडा या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App