विशेष प्रतिनिधी
चेन्नई – तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत आज मतदानाचा दिवस वेगवेगळ्या घटनांनी गाजला. तमीळ सुपरस्टार विजय यांनी आज मतदान केंद्रावर जाण्यासाठी चक्क सायकलचा वापर केला. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही अनेक चाहत्यांनी केला. ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करणे भाग पडले. Superstar vijay used cycle for voting
अनेकांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. त्यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्याचाही अनेकांचा प्रयत्न होता. विजय यांनी वेगाने सायकल चालविण्याचा प्रयत्न केला, पण ते चाहत्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकले नाहीत.
विजय यांचा इंधनदरवाढीबाबत काही संदेश देण्याचा उद्देश होता का अशी चर्चा द्रमुक पक्षाच्या नेत्यांनी केली, मात्र मतदान केंद्र घराच्या बाजूलाच, मात्र अरुंद गल्लीत असल्यामुळे आणि मोटारीतून गेल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जास्त असल्यानेच त्यांनी सायकल वापरली असे त्यांच्या सहाय्यकाने स्पष्ट केले.
Tamil Nadu: Actor Vijay rode a bicycle to the polling station at Vels International Pre School, Neelankarai in Chennai pic.twitter.com/vKcL3mwloE — ANI (@ANI) April 6, 2021
Tamil Nadu: Actor Vijay rode a bicycle to the polling station at Vels International Pre School, Neelankarai in Chennai pic.twitter.com/vKcL3mwloE
— ANI (@ANI) April 6, 2021
काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवीत असलेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सोशल मिडीयावरील चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. विजय यांनी इंधनदरवाढीबद्दल कोणताही संदेश दिलेला नाही. द्रमुकने दुसऱ्या कुणाच्या तरी सायकलवर स्वार होऊन आपला मुद्दा रेटणे थांबवावे असा टोला त्यांनी मारला.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App