Rishabh Pant – भारतीय क्रिकेट संघाला मिळत गेलेले उत्तम कर्णधार हाच संघाच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमधील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. प्रत्येक कर्णधारानं त्याच्या प्रयत्नांनी संघाला यशाच्या शिखराकडे नेण्यासाठी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे प्रत्येक कर्णधारानं त्याच्या आधीच्या कर्णधारापेक्षा उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याला यशही मिळालं. विराट कोहली सध्या भारताचा कर्णधार आहे. भारतीय संघ हा जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल आहे. पण गेल्या काही दिवसांत विराटनंतर कोण हा प्रश्न अनेकदा समोर येत आहे. त्यावर अनेकांची मतंही जुळायला लागली आहेत. ऋषभ पंत कडे अनेकजण भावी कर्णधार म्हणून पाहत आहेत. आणखी एका वरिष्ठ क्रिकेटपटूनं ऋषभच्याच नावाला पसंती दिली आहे. Rishabh Pant is being discussed as future captain of team India
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App