विशेष प्रतिनिधी
मुंबई :अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा जनसामान्यांसाठी मदत घेऊन आला आहे. मागील लॉकडाउन मध्ये अनेक लोकांची विशेषता स्थलांतरीत मजदूरांची मदत केल्यानंतर सोनू सूद चर्चेत आला होता. व त्यानंतर त्याने अनेक प्रकारे वेगवेगळ्या लोकांची कधी आर्थिक तर कधी शैक्षणिक अशी मदत केली.आता परत महाराष्ट्र थांबलाय अन् सोनू आलायं!MAHARASHTRA LOCKDOWN: All the heroes of the movies are ahead of you Zero: Sonu Sood Devdutach!
आता सोनूचं आणखी एक ट्वीट चर्चेत आलं आहे.
महामारीची सगळ्यात मोठी शिकवण… देश वाचवायचा असेल तर दवाखाने बनवावे लागतील’. तेव्हा आता सोनू दवाखाना निर्माण करण्याचा तर विचार करत नाही ना असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. पण त्यावर सोनूने अजून काहीच स्पष्ट भाष्य केलं नाही.
महामारी की सबसे बड़ी सीख: देश बचाना है तो और अस्पताल बनाना है। — sonu sood (@SonuSood) April 15, 2021
महामारी की सबसे बड़ी सीख:
देश बचाना है तो और अस्पताल बनाना है।
— sonu sood (@SonuSood) April 15, 2021
सोनूच्या ‘सोनू सूद या फांउडेशन’ (sonu sood foundation) तर्फे तो रोज अनेकांना निरनिराळ्या प्रकारची मदत करतो. तर ट्विट करत मदत पोहोचल्याचही गरजू त्याला सांगतात. त्याच्या ट्विटर हॅन्डल वर तो ही माहीती शेअर करत असतो.
समझो हो गया म्हणतं तो तत्काळ मदतीला धावून जातो.
समझो हो गया। Monday सर्जरी हो जायेगी। @IlaajIndia @SoodFoundation@drkvask #sisterthomasamma https://t.co/SjV49aielI — sonu sood (@SonuSood) April 15, 2021
समझो हो गया। Monday सर्जरी हो जायेगी। @IlaajIndia @SoodFoundation@drkvask #sisterthomasamma https://t.co/SjV49aielI
अनेकांना शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी, रोजगार मिळण्यासाठी सोनूने काम केले आहे. सुरुवातीला सामाजिक जाणिवेतून व्यक्तिगत स्वरूपात त्याने सुरु केलेल्या कामाची व्याप्ती आता वाढली असून त्याला अनेक सहकारी लाभले आहेत आणि अनेक जण आपल्या अडचणी ट्विट करून त्याच्यासमोर मांडत आहेत. सोनूही तत्परतेने त्यांच्या मदतीसाठी धाव घेत आहे.
या आधी सोनूने करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या परिक्षा पुढे ठकलण्याची मागणी केली होती. तर या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर त्याने यावर त्याची प्रतिक्रिया दिली होती. “शेवटी हे झालचं, सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा”, अशा आशयाचे ट्विट करत सोनून सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App