विशेष प्रतिनिधी
मुबंई : सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेता कार्तिक आर्यन आता एका नवीन भूमिकेमध्ये दिसणार आहे. धमाका हा त्याचा नवीन सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या नेटफ्लिक्स सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे.
Kartik aryan starrer dhamaka movie trailer has been released
या ट्रेलरमध्ये कार्तिक एका न्यूज अँकरिंग रूममध्ये बसलेला दिसून येत आहे. त्या न्यूज चॅनेल्सची हेड जिचा रोल अमृता सुभाषने प्ले केला आहे. ती त्याला चॅनल्सचे टीआरपी वाढवण्यासाठी सतत सूचना देताना दिसून येतेय
Sooryavanshi Movie : ये दिवाली अक्षय वाली ! अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका ; 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!
या चॅनलला मुंबई मधील एका भागामध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. आणि या बातमीचा वापर करून आपल्या चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी जो काही खेळ चाललेला असतो, तो या सिनेमामध्ये दाखवला जाणार आहे.
दहशतवाद्यांसोबत कार्तिकचे होणारे बोलणे, दहशतवाद्यानी ब्लॅकमेल करणे, बॉम्ब ब्लास्ट होण्यापासून थांबवू शकतात का? अशा घटनांवर आधारित हा सिनेमा असणार आहे. राम माधवी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. कार्तिकने त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना म्हटले, आजवरच्या आयुष्यातील सर्वात चॅलेंजिंग रोल धमाका सिनेमातील रोल होता. कारण हा सिनेमाचे शूटिंग त्याने फक्त नऊ दिवसांमध्ये पूर्ण केले आहे. कार्तिक लवकरच भूलभुलैया टू या सिनेमामध्ये दिसून येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App