विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने दैनंदिन हवामान अंदाजात गिलगिट बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादचा समावेश केल्यानंतर भारताला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याच्या नादात पाकिस्ताने सेल्फ गोल करवून घेतला आणि नेटीझन्सकडून खिल्ली उडवून घेतली.
पाकिस्तानी रेडिओने लडाखच्या हवामान अंदाजात घोळ घातला. अधिकतम – न्यूनतम तापमानाची आकडेवारी उलटसुलट वाचली. या प्रकारामुळे सोशल मीडियातून पाकिस्तानची जाम खिल्ली उडविण्यात आली. मीम्स तयार करण्यात आली. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना नाही नाही ते ऐकून घ्या़यला लागले.
शिक्षणाऐवजी दहशतवादावर खर्च केला की असे होते, इथपासून इम्रान खान शाळेत जा इथपर्यंतच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. maximum minimum शब्दावरून नेटीझन्सनी paxmum शब्द तयार केला आणि त्याच्या मोठा ० टाकला. भारताला गिलगिट बाल्टिस्तान वरून लडाख हे उत्तर देण्याच्या नादात पाकिस्तान तोंडावर पडला.
Array