गुंतवणुकीतील मुदत विमा योजनेचे मोल जाणा


पैशांची गुंतवणूक करताना केळ त्यातून परतावा किती मिळतो याचाच विचार दरवेळी करून चालत नाही. काही वेळा आहे ते टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विमा हा या प्रकारात येतो. मुदत विमा योजना फक्त एखाद्याची विद्यमान गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा उद्धेश पूर्ण करत नाही तर भविष्यात कुटुंबातील सदस्यांचं कौटुंबिक ध्येयदेखील सहजतेने पार पाडण्यास मदत करते. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असणाऱ्या सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास कौटुंबिक ध्येय मोडकळीस येत नाहीत, कारण मिळणारी रक्कम हयात असलेल्या सदस्यांद्वारे वापरली जाऊ शकते. Understanding the value of an investment term insurance plan

आर्थिक जबाबदारी असणारी प्रत्येक व्यक्ती जो मुदत विमा योजना विकत घेत आहे त्याने एक रुपयांची गुंतवणूकदेखील दीर्घकालीन उद्दीष्टांच्या हेतूने करणं आवश्यक आहे. आर्थिक निर्णय हा प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच एक महत्वाचा राहणार आहे. मुदत योजना ही जीवन विम्यातील सर्वाधिक उत्तम योजना असून कमी प्रीमियम आणि हाय कव्हरेज देते. ही योजना कशा पद्धतीने काम करते हे माहिती हवे. तुम्ही जो प्रीमियम भरणार आहात तो मुख्यत्वे चार गोष्टींवर अवलंबून असेल. विमा रक्कम खरेदी करणं आवश्यक, तुमचं वय, लिंग आणि किती वर्षांसाठी तुम्हाला ही पॉलिसी हवी आहे. पॉलिसीच्या मुदतीत मृत्यू झाल्यास विमा रक्कम ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीला दिली जाते.

तर पॉलिसी होल्डर मॅच्यूरिटी होईपर्यंत जीवंत राहिल्यास काहीही दिलं जात नाही. म्हणजे समजा की, एखाद्या व्यक्तीने ३० वर्षांसाठी दीड कोटीची विमा रक्कम असणारी मुदत विमा योजना विकत घेतली. पॉलिसी कालावधी सुरु असतानाच जर त्या विमाधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला दीड कोटींची रक्कम एकत्रित दिली जाते. निष्कर्ष असा की मुदत विमा योजनांमधील वेगवेगळ्या प्रकारांची माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरुन तुम्हाला आपल्या विशिष्ट गरजांप्रमाणे खरेदी करण्याचा योग्य निर्णय घेण्यात मदत होईल. तुम्ही कोणती योजना खरेदी करता हे महत्वाचं नसून, शक्यतो दर पाच वर्षांनी आपल्या जीवन विमा योजनेच्या गरजेची पुन्हा एकदा पडताळणी करणं गरजेचं आहे.

Understanding the value of an investment term insurance plan

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात