पैशांच्या तंगीवेळी मनात समृद्धीचेच विचार आणा

सध्या साऱ्या जगभर, आपल्या आजूबाजूला निराशेचे वातावरण आहे. अशावेळी मनात नेहमी निराशेचे विचार येतात. त्यामुळे मन अशांत होते. अशावेळी सकारात्मक विचार मनात आणणे फार गरजेचे असतात. प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी फार वेगळ्या पद्धतीने लिहले आहे. Think of prosperity in times of financial crisis

नेहमीच्या कोणत्याही पुस्तकात पसे कसे मिळवावे, गुंतवावे, टिकवावेत याबाबत लिहलेले असते. मात्र बर्न यांनी मात्र वेगळेच लिहलिले आहे. त्या लिहताता, पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असा, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल. प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती ही चांगल्या गोष्टी जीवनात येण्यास प्रतिबंध करते आणि यात पैसाही अंतर्भूत आहे असे त्यांचे ठाम मत आहे.

आपण जेव्हा तंगीत किंवा संकटात असतो त्यावेळी पैशांची उणीव किंवा तुटवडा या विषयी विचार करण्यापेक्षा आपण समृद्ध झालो तर काय काय करणार आहोत याचा विचार करायला हवा. खरेत तर ते सोप काम नाही. पण प्रयत्न केल्यास अगदी अशक्यदेखील नाही. अशा वेळी समृद्धीचा विचार करा. त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करा. म्हणजेच आपल्या हातून काम घडते आणि त्याचा परिणाम पैश्यांच्या प्राप्तीवर सुद्धा होतो.

अजून एक गोष्ट म्हणजे पैसा किंवा तुम्हाला कोणतीही आवश्यक वाटेल ती बाब मिळण्याचा एक शार्ट कट म्हणजे आनंदीत रहा. सुख अनुभवा. मनासारख्या वस्तू वा पैसा जीवनात आणण्यासाठीचा मार्गच हा आहे. तुम्ही आनंद आणि सुख या भावना तुमच्या आसपास पसरवा म्हणजे त्याच तुमच्याकडेही आकर्षित होतील. तुमच्या आयुष्यात पैसा आणि सुख आणतील. तुमचे आंतरीक विचार सर समृध्द , सुविचार असतील तर तशीच तुमचीही भरभराट होईल हे नक्की.

Think of prosperity in times of financial crisis