मनी मॅटर्स : सखोल विचार करा, नाही म्हणायला शिका


जर तुम्ही एका माणसाला शिकवलं तर तुम्ही एका व्यक्तीला शिकवता, जर तुम्ही एका स्त्रीला शिकवला तर तुम्ही पूर्ण घराला शिकवता. हा विचार गुंतवणुकीच्या बाबतीतही अंमलात आणायला हवा. गुंतवणूक करण्यासाठी लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, दुरचा विचार करणे आणि संयम राखणे. ह्या दोन गोष्टी महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे त्या चांगल्या गुंतवणूकदार होवू शकतात. पण याउलट चित्र आपल्याला आपल्या समाजात दिसून येते. महिलांना गुंतवणूकीचे निर्णय घेताना जास्त प्राधान्य दिले जात नाही. एका जागतिक सर्वेक्षणानुसार, महिला पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पैशाचं व्यवस्थापन करतात. महिला उद्देशानुसार गुंतवणूक करतात. Think carefully, learn to say no

कमी धोका घेतात. संयम राखतात. गुंतवणूकदाराचे खरे काम भविष्याला आज पाहणे हे आहे. गुंतवणूक करताना तुम्हाला फार हुशार असायची गरज नाही. बस सामन्य ज्ञान असले, साधे गणित आले, व्यवसाय समजता आला झाले. सर्वात जास्त महत्त्वाची कोणती गोष्ट पाहिजे असेल तर संयम. व्यापारात अनेक उतार चढाव येतात, म्हणून नुकसान हे अल्पकालीन आहे कि दीर्घकालीन? हा विचार करावा, आणि त्या नुसार निर्णय घ्यावे. संयमाचा अर्थ काहीच करू नये असा नसून, संयमाचा अर्थ आहे कि फार कमी वेळा तुमचा निर्णय बदलणे. बसचा मासिक पास काढला ना तुम्ही ? त्यात कसे असते कि तुम्हाला ३० वेळा प्रवास करता येईल. तसे समजा कि एक गुंतवणुकीचा पास भेटला आहे. त्याचा वापर जीवनात तुम्ही फक्त २० वेळा वापरू शकता. तुम्ही जीवनात २० वेळाच गुंतवणूक करणार आहात. असे का ? तर यामुळे तुम्ही फार कमी निर्णय घ्याल. कमी निर्णय घ्याल तर तुम्हाला विचार करायला जास्त वेळ मिळेल. जास्त वेळ मिळाला तर, तुमचा तो निर्णय बरोबर असण्याची शक्यता फार जास्त असते.

कारण तुम्ही वेळ देऊन, संशोधन करून निर्णय घेतला आहे. गुंतवणूकदाराला हो पेक्षा नाहीच जास्त वेळा बोलावं लागतं. कारण चांगल्या गुंतवणुकीच्या संधी फार कमी उपलब्ध असतात. महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील, तर महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींना नाही म्हणावेच लागेल. तुमचा वेळ हा कसा ? कुठे ? व्यतीत व्हावा हे तुम्ही ठरवल पाहिजे. तसेच तुमचा पैसा कुठे गुंतवला जाईल? हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे. नाही म्हणायला शिका. उधार द्यायला आणि घ्यायला पण, नाही म्हणायला शिका. तुम्हाला नेहमी गर्दीच्या दूर राहावे लागेल. जे सर्वच करतात ते करून, पैसे बनत नाही. इतर करत आहेत त्यापेक्षा वेगळं केल नाही, तर तुम्ही इतरांपेक्षा जास्त पैसे बनवू शकणार नाही. तुम्ही काय करताय ? हे जेव्हा तुम्हाला माहीत नसतं, तेव्हा ते धोकादायक असत. निवडक गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करून त्यांचा अभ्यास केला तर धोका कमी करता येतो. लक्ष्य केंद्रित करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींना नाही म्हणावेच लागेल.

Think carefully, learn to say no

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात