कमी जोखीम घेत करा या योग्य ठिकाणी गुंतवणूक


जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल मात्र, जोखीम घ्यायची नसेल, तर सरकारच्या बर्यााच बचत योजना आहेत. ज्यात तुम्ही गुंतवणूक करु शकता. सरकार वेळोवेळी या बचत योजनांचे व्याज दर बदलते. या योजनांना वार्षिक चार ते साडे सात टक्के व्याज मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात जुना आणि सुरक्षित पर्याय आहे. Invest in the right place at the lowest risk

येथे आपण बचत खाते फक्त पाचशे रुपयांमध्ये उघडू शकता, हे खाते अगदी बँक बचत खात्यांसारखे आहे. परंतु या योजनेतील गुंतवणूकीवर वर्षाकाठी चार टक्के व्याज दिले जाते. याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये ठेव खातीही उघडता येतात. ज्यामध्ये आपण एक ते पाच वर्षे गुंतवणूक करू शकतो. एक ते तीन वर्षांसाठी तुम्हाला गुंतवणूकीवर साडे पाच टक्के आणि पाच वर्षांसाठी पावणेसात टक्के रक्कम मिळेल.

पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग ठेवीवर आपल्याला अधिक व्याज देखील मिळू शकते. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत पती-पत्नी एकत्रितपणे तीस लाख रुपयांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी) वर सध्या ६.८ टक्के व्याज मिळत आहे. त्यात केलेल्या गुंतवणूकीवर 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो.

जर आपत्कालीन परिस्थितीत एनएससीला तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेता जाऊ येते. पीपीएफ ही भारतातील सर्वात लोकप्रिय कर बचत योजना आहे, त्यामध्ये केलेली गुंतवणूक पंधरा वर्षांत पूर्ण होते. पीपीएफ गुंतवणूकीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. तुम्ही पीपीएफ खात्यात किमान पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख लाख रुपये गुंतवू शकता.

जर आपल्या मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर आपण सुकन्या समृद्धि योजनेत मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकता. या योजनेवर सध्या ७.६ टक्के व्याज प्राप्त होत आहे. या योजनेत एखादी व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी खाते उघडू शकते. वयाच्या २१ व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत ही रक्कम ९ वर्ष ४ महिन्यांत दुप्पट होते.

Invest in the right place at the lowest risk

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात