मनी मॅटर्स : वयानुसार बदला गुंतवणुकीचे स्वरुप, कोणत्या वयात कोठे करा गुंतवणूक ?

गुंतवणूक करताना आपण हा विचार नाही केला पाहिजे, कि खर्च करून किती उरेल ? गुंतवणूक करताना आपण पाहिले पाहिजे कि आपल्याला किती पैसे लागणार आहेत? त्यासाठी आज किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या जीवनात काही मुख्य गोष्टी असतात ज्या त्याला कराव्या लागतात. निवृत्तीची सोय, मुलांच लग्न, मुलांचे शिक्षण, आजारपणाची सोय, घर. या गोष्टींसाठी तुम्हाला किती पैसे लागतील ते लिहा. हि झाली तुमची आर्थिक उद्दिष्टे. हि पूर्ण करायला तुमच्याकडे किती वेळ आहे? त्यानुसार प्रत्येक उद्दिष्टासाठी तुम्ही एक गुंतवणूक केली पाहिजे. यशस्वी गुंतवणुकीला वेळ. शिष्ट आणि धैर्य लागते. कोणी एका उत्पन्नावर अवलंबून राहू नये. आपण जेव्हा फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहतो तेव्हा आपण फार जास्त धोका घेतो. त्यामुळे गुंतवणूक करणे फार आवश्यक आहे. अश्या प्रकारे आपण एक दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत तयार करतो आणि धोका कमी करतो.
आपल्या उत्पन्नाचा एक स्त्रोत काही दिवस बंद झाला तर दुसऱ्या स्त्रोताच्या साहाय्याने काही दिवस काढू शकतो. Change the nature of investment according to age, at what age and where to invest?

नौकरी करणाऱ्यांना गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना नेहमी दबावाखाली जगाव लागेल कि मला कामावरून काढल जाऊ शकते. गुंतवणुकीची सुरवात कधी करावी ? जेव्हा तुम्हाला गुंतवणुकीचे महत्व कळेल तेव्हापासून. मग तुमच वय काहीही असो. १० किंवा ६० जस जस विज्ञान प्रगती करत आहे, माणसाचा आयुष्य वाढत आहे. कोणालाच माहित नाही आपण किती वर्ष जगू. मग ६० वयाच्या माणसाने पण गुंतवणूक केली पाहिजे आणि १० वर्ष्याच्या पण. मग ह्या दोघानी सारखी गुंतवणूक केली पाहिजे का ? उत्तर आहे, नाही! १० वर्षाच्या मुलाकडे खूप वेळ आहे. तो जास्त धोका पत्करू शकतो, आणि ६० वर्षाचा माणूस कमी. म्हणून गुंतवणूक सर्वांनी करावी. पण आपल्या वयानुसार धोका पत्करून. समजा तुमचे वय x आहे तर तुम्ही (१००-x) एवढी गुंतवणूक शेअर बाजारात केली पाहिजे. साध्या भाषेत म्हटलं तर अशी गुंतवणूक ज्यात इतरांपेक्षा जास्त धोका आहे. काही तरुण इतक्या लवकर कशाला गुंतवणूक करायची असे समजतात. मात्र एक लक्षात ठेवा. पाच वर्ष उशिरा गुंतवणूक म्हणजे ५७ लाखांचं नुकसान. समजा दरमहा २,००० रुपये अशी सलग ३० वर्ष गुंतवणूक केली आणि त्यावर १५ टक्के वार्षिक परतावा पकडला, तर जमा होणारी रक्कम होते एक कोटी १२ लाख. २,००० दरमहा २५ वर्ष गुंतवणूक केली आणि १५ टक्के वार्षिक परतावा पकडला, तर जमा होणारी रक्कम आहे ५५ लाख. म्हणजे ५ वर्षांत ५७ लाखांचे नुकसान. अर्थात यात पंधर टक्के परतावा गृहीत धरला आहे. त केवळ शेअर बाजारतच मिळू शकतो.

Change the nature of investment according to age, at what age and where to invest?