भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा फोन भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना आला
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारताने कुठल्याही दहशतवादाला युद्ध समजूनच ठोकायचे असा धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दल आणि लष्कराने सियालकोट चकलाला यांच्यासह सात पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर हल्ले केले. पण पाकिस्तानने ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे दावे केले. ते भारताने फेटाळून लावले.
याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो मार्ग 3 – ‘ॲक्वा लाइन टप्पा 1 सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.
भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, राफेल बनवणारी कंपनी डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स गेल्या २ आठवड्यात ८% पेक्षा जास्त वाढले आहेत.
ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यापासून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत आज तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची ढाल अशी सगळी पापे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी वाचली.
भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू करताच पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे अभिनंदन केले आहे.
“ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती वाटली म्हणूनच ते पाकिस्तानला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवायला समोर आल्याचे चित्र आज दिसून आले.
व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढऱ्या धुराचे लोट उठले आहेत. याचा अर्थ कॅथोलिक चर्चच्या कार्डिनल्सनी पुढील पोप निवडला आहे. गुरुवारी, वरिष्ठ कार्डिनल्सनी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये घोषणा केली की अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे नवे पोप असतील आणि त्यांना पोप लिओ चौदावे म्हणून ओळखले जाईल. रॉबर्ट प्रीव्होस्ट हे पहिले अमेरिकन पोप आहेत.
भारताने यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला तोंड देताना पाकिस्तानचे प्रत्यक्ष नाकी नऊ आलेत. कारण त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाली.
जम्मू आणि काश्मीरसह भारतातील काही राज्यांवर पाकिस्तानने हल्ला केला. हे हल्ले भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान आणि दोन जेएफ १७ विमान पाडले. यासोबतच जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ड्रोन हल्लेही हाणून पाडले.
भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 लढाऊ विमान पाडले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई दलाचे AWACS विमान त्यांच्याच पंजाब प्रांतात पाडले गेले. हे विमान पाकिस्तानच्या सीमेत पडल्याचे सांगण्यात येत आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. म्हणजेच ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही कारवाई थांबलेली नाही.
जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप (ताडीवाल रोड, पुणे) यास ATS ने अटक केली. लॅपटॉप एक दोन नव्हे, तर तब्बल 15 वर्षे फरार होता.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी आपण घेतो असे इंग्लंडमध्ये सांगून आपल्या राजकीय मोठेपणाचा आव आणून दाखविला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला राहुल गांधी कसे जबाबदार नेते आहेत आणि ते चुका मान्य करून त्याची जबाबदारी देखील कशी घेतात याची वर्णने करणारे ट्विट आणि व्हिडिओ राहुल गांधींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले. पण राजकीय वस्तुस्थिती पाहिली, तर राहुल गांधींनी चुकांची घेतलेली जबाबदारी आणि प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या चुका आणि त्यामुळे सगळ्या देशाला चुकवावी लागलेली किंमत यातली फार मोठी विसंगती समोर येते.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातले मोदी सरकार पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक किंवा अन्य कुठला स्ट्राईक कधी करणार याकडे डोळे लावून बसलेल्या सोशल मीडिया वीरांना भारत – पाकिस्तान युद्धाची एवढी “तहान” लागली आहे
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरचा कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ठपका त्यांच्या वयाच्या 81 व्या वर्षी दूर झाला. कलमाडी भ्रष्टाचाराच्या आरोपातून निष्कलंक बाहेर आले. शरद पवारांच्या एके काळच्या राजकीय शिष्याने भ्रष्टाचाराच्या आरोपातून “निष्कलंक” बाहेर येण्याची किमया साधली, पण त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या राजकीय अथवा अन्य कुठल्या कर्तृत्वाचा किती भाग होता, हा संशोधनाचा विषय ठरावा.
चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची, पण प्रत्यक्षात कृती मात्र पाकिस्तानला चिथावणीची देण्याची राहिली असल्याची बाब पहलगाम हल्ल्यानंतर समोर आली. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर बाकी बड्या देशाच्या सगळ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोनवरून बातचीत केली. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इम्युअल मॅक्रोन, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी आदी बड्या देशांच्या प्रमुखांचा समावेश होता. रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे देखील भारताच्या पाठीशी उभे राहिले. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला नाही.
नाशिक : पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानचा सूड उगवण्यासाठी निर्णय घेणारे महत्त्वाचे लोक शांतपणे कामात मग्न, पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!, अशी सगळ्या देशात […]
जसा आजोबा तसाच नातू; दोघांच्याही धमक्यात तद्दन फालतू!!, असलाच पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार राहिलाय. आजोबाने जशी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती, तशीच त्याच्या नातवाने भारताला सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. पण त्याचा आजोबा भारताचा कुठलाच केसही वाकडा करू शकला नाही, उलट त्या आजोबालाच भारतात येऊन भारतीय नेत्यांसमोर नाक घासावे लागले. त्यापेक्षा त्या आजोबाच्या नातवाची अवस्था वेगळी होण्याची शक्यता नाही.
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात काही मोठे निर्णय घेतले. त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही काही पावले उचलली – जसं की वाघा बॉर्डर बंद करणं, सार्क व्हिसा सुविधा थांबवणं आणि भारतीय विमानांसाठी आपली आकाशमर्यादा बंद करणं.
जम्मू – काश्मीरच्या पहलगांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे केले हत्याकांड, तरीही लिबरल पुरोगामी काढतायेत हिंदूंच्या विरोधातच फुत्कार!! असला प्रकार काँग्रेसी आणि पवारांच्या राष्ट्रवादी संस्कृतीत वाढलेल्या पुरोगाम्यांनी सुरू केलाय. राजू परुळेकर, विश्वंभर चौधरी, संग्राम पाटील, छाया थोरात आदींनी हिंदुत्वाच्या विरोधात ट्विट केली.
पहलगाम मधल्या हिंदू हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानवर वेगवेगळे कठोर निर्बंध लादले. त्यामध्ये पंडित नेहरूंनी 1960 मध्ये पाकिस्तान बरोबर केलेला सिंधू जल करार मोदी सरकारने स्थगित केला. मात्र त्यामुळे पाकिस्तानला खरा हादरा बसला. पाकिस्तानी सरकारचा प्रचंड संताप झाला. भारताविरुद्ध आगपाखड करत पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ सरकारने भारताला नवी धमकी दिली.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर आलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेत. या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे गांभीर्य फार मोठे आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App