मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठीचा अजेंडा पुन्हा एकदा पुढे रेटला. पण मराठी भाषा आणि अस्मितेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंची युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलखोल केली.
5 फेब्रुवारी पर्यंत पवार काका – पुतण्यांची एकी; पण केंद्रीय मंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे घोडे पुढे दामटले जाताच पुन्हा बेकी!!, अशी दोन्ही राष्ट्रवादींची अवस्था होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी जास्तीत जास्त महापालिका निवडणूक भाजप 1 नंबर वर राहील, यात काही विशेष नाही, त्यापेक्षा भाजप ठाकरे आणि पवारांचे वर्चस्व कायमचे मोडणार का??, या सवालाच्या उत्तराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नाशिक : मुंबई महापालिकेकडे फक्त 140 PADU मशीन्स आली आहेत त्यांचा वापरही केवळ अपवादात्मक होणार आहे पण फक्त “पाडू”, हा शब्द आल्याबरोबर ठाकरे बंधू घाबरले […]
शंभर कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा भाजपवर आरोप करून अजितदादाच फसले; त्या वेळच्या अधिकाऱ्याने अजितदादांच्या भ्रष्टाचारी कळसाचे किस्से बाहेर आणले.
सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!, असे आज पुणे महापालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडले.
मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अजितदादा अडकले; बाजीराव पेशव्यांना “कर्तृत्ववान” म्हणावे लागले!!, असे राजकीय नाट्य आज पुण्यात घडले.
व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!, असाच प्रकार राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरल्या भाषणानंतर समोर आला.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी हमीपत्र जारी करून जो “गेमचेंजर’ डाव टाकला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचर मारली. अजितदादांच्या मेट्रोच्या फुकट प्रवासाची पुरती पोलखोल केली. त्यामुळे अजितदादांचा तथाकथित “गेमचेंजर” डाव मतदानापूर्वीच उधळला गेला.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी हमीपत्र जारी करून जो “गेमचेंजर’ डाव टाकला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचर मारली. अजितदादांच्या मेट्रोच्या फुकट प्रवासाची पुरती पोलखोल केली.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संयमाची अपेक्षा केली होती. प्रत्यक्षात त्यांचा संयम ढळला आणि अजितदादांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागली.
मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या सभेत शरद पवारांचा तुतारीवाला डाव्या हाताला ठेवून राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी स्टेजवर शरद पवार नव्हते, तर त्यांचे प्रतिनिधी जयंत पाटील सभेला हजर होते. राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी जयंत पाटलांचेच भाषण तिथे झाले होते.
मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या सभेत शरद पवारांचा तुतारीवाला डाव्या हाताला ठेवून राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आपले सगळे बळ तिथे एकवटले खरे, पण त्यामुळे भाजपला इतर 27 महापालिकांमध्ये पूर्ण मोकळे रान मिळाले. ठाकरे बंधू मुळातच विरोधात गेल्यामुळे भाजपला मुंबईत एकनाथ शिंदे यांची साथ मिळाली आणि तिथे ठाकरे बंधूंना जखडून ठेवण्यात भाजपा यशस्वी झाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला टार्गेट करणार त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे लागणार याची जाणीव भाजपच्या नेत्यांना होतीच त्यानुसार देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, अमित साटम या नेत्यांनी तशी तयारी केली होती ती तयारी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत उपयोगी ठरली.
नको बारामती, नको भानामती, अशा घोषणांची आठवण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या ऐन मोक्याच्या क्षणी आज काढण्यात आली. या घोषणांमधून पिंपरी चिंचवडकरांच्या मनातल्या पार्थ पवारच्या पराभवाच्या आठवणींना उजाळा द्यायची आयडिया भाजपच्या नेत्यांनी पुढे आणली.
दादा – ताईंच्या ऐक्यात प्रफुल्ल पटेलांची पाचर; केंद्रातल्या सत्तेच्या खुर्चीसाठी “पवार संस्कारितांची” तडफड!!, हेच राजकीय वास्तव चित्र प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाखतीतून समोर आले.
प्रखर हिंदुत्व ते हिंदू – मुस्लिम वादाला घाबरणारा पक्ष; ठाकरेंच्या शिवसेनेचे हरवून गेले लक्ष्य!!, शिवसेनेची अशीच अवस्था मुंबईतून समोर आले.
इंजिनात बसून मशालीने विरोधकांना जाळायची भाषा; पण ठाकरे बंधूंना आपल्या पक्षांमधली गळती रोखता येईना!!, अशी अवस्था मुंबईत झाली आहे.
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी हराकरी केली, पण त्याचवेळी भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस भारी ठरली. 29 महापालिकांमध्ये महाविकास आघाडीने एकवटून निवडणुका लढवलेली नाही. उलट सर्वच्या सर्व महापालिकांमध्ये सगळे विरोधक विस्कटलेल्या अवस्थेत निवडणूक लढवताना दिसतात. त्यामुळे भाजप समोर विरोधकांचे कुठले आव्हानच नाही. मुंबईत ठाकरे बंधू, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका – पुतणे या दोन राजकीय घराण्यांनीच भाजपकडे थोडेफार आव्हान निर्माण केले. काँग्रेसवाले तर यात फार मागे पडले, पण असे असताना सुद्धा भाजपवाल्यांनी सरळपणे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून “सेल्फ गोल” करण्यात “धन्यथा” मानली.
पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांनी केली “गेम”; महापालिकेला तसे करण्याचे अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन, ती वस्तुस्थिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या हमीपत्र नंतर समोर आली.
पिंपरी चिंचवड मध्ये स्थानिक नेतृत्व एकवटून अजित पवारांना थेट “आवाज” टाकणाऱ्या भाजपा आमदार महेश लांडगे यांना घेण्यासाठी पवार कुटुंबाला एकवटावे लागले.
अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!, हेच राजकीय चित्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने समोर आले.
महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!, असलाच प्रकार महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने समोर आलाय. महापालिकांच्या निवडणुकात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचार केला जातोय. त्यात स्थानिक मुद्द्यांपासून ते नेत्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत सगळे विषय चघळले जात आहेत. त्यातच काही नेत्यांनी शरद पवारांच्या पासून ते हिजाबवाल्या महिलेच्या पंतप्रधान पदापर्यंतची चर्चा या निवडणुकीत पुढे आणली. त्यामुळे ही निवडणूक जास्तच रंगतदार झाली.
विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने; पण अजितदादांनी त्याचे श्रेय दिले शरद पवारांना!!, असे आज लातूरमध्ये घडले.
अंबरनाथच्या नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार मोठी खेळी केली खरी, पण ती सुद्धा तोकडी ठरली. अंबरनाथ नगर परिषदेत बहुमताची बाजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच मारली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App