भाजप मधल्या टॅलेंट ची सुप्रिया सुळेंना चिंता;; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला उपयोग का होईना??, असा सवाल सुप्रिया सुळे यांच्या आजच्या वक्तव्यातून समोर आला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे की नाही, याविषयी संभ्रम वाढला असून त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात शरद पवारांच्या घरातूनच दोन परस्पर विरोधी वक्तव्ये समोर आली.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ येणार का??, असा सवाल विचारायची वेळ खुद्द अजित पवारांच्या वक्तव्याने आली.
बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!, अशी बिहार राज्यातली अवस्था झाली आहे.
राष्ट्रपतींनी आज 4 महनीय व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती केली असली, तरी खऱ्या अर्थाने राज्यसभा निवडणुकीतली चुरस पुढच्या वर्षी 2026 मध्ये होणार आहे
दहशतवाद्यांना धडकी भरवणारे वकील उज्ज्वल निकम, केरळमध्ये मार्क्सवाद्यांविरुद्ध प्रचंड संघर्ष करणारे सदानंद मास्टर, इतिहासकार मीनाक्षी जैन आणि माजी परराष्ट्र सचिव हर्ष श्रांग्रीला यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर निवड केली.
महाराष्ट्रातल्या महापालिका जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होवोत, 2025 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत घ्यावा लागणार हे लक्षात घेऊन महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापली राजकीय बांधबंदिस्ती सुरू केली, पण यातला महायुतीचा खरा फॉर्म्युला कुणीच सांगितला नाही, तो म्हणजे ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!, हा तो फॉर्म्युला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातम्या आज सकाळपासून दुपारपर्यंत सगळ्या महाराष्ट्रभर फिरल्या. त्यानंतर बराच वेळाने शरद पवारांनी कालच नेमलेले राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला. करून जयंत पाटील आजही प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला नाही त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या चालवायला लावून कुणीतरी खोडसाळपणा केला, असा राग काढला.
मोहन भागवत आणि मोदींना VRS घ्यायचा सल्ला; पण सल्लागारांना लोकांनीच CRS देऊन ठंडा केलाय मामला!!, अशी खरं म्हणजे संघ + भाजप काँग्रेस आणि उबाठा असल्या पक्षांची अवस्था झाली आहे.
75 ची रिटायरमेंटची शाल, मोहन भागवतांचे शालजोडीतले उद्गार आणि त्या पलीकडचा खरा स्थित्यंतराचा विचार!!, हे काही सहज सुचलेले शीर्षक नाही.
मोदी + शाहांना विरोधकांचा रिटायरमेंटचा सल्ला; पण स्वतःचे घरगुती पक्ष कुरकुरत चालवा!! असे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच विरोधी पक्षांची अवस्था झालीय.
शिक्षकांच्या आंदोलनात पवार + ठाकरेंची राजकीय घुसखोरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पुरती पोलखोल केली!!, असे आज विधान परिषदेत घडले.
निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी, पण त्यामुळेच “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी यायची जबाबदारी??, असा सवाल तयार झाला.भाजपचे बडबोले खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांविरुद्ध बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले. ठाकरे बंधूंना ठोकता ठोकता निशिकांत दुबे मराठी लोकांवर घसरले. बाहेरच्यांच्या टॅक्स वर मराठी लोक जगतात, असे बोलून बसले. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भात खुलासा करावा लागला. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यापासून महाराष्ट्र भाजपला अंतर राखावे लागले. पण जे काही झाले ते “पॉलिटिकली कॅल्क्युलेटेड” झाले असेच बोलले गेले. कारण त्यातून मराठी – अमराठी मतांचे ध्रुवीकरण समोर आले.
रायगड मध्ये शरद पवारांची भाषा पुरोगामी, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फरफट ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या दारी!!, अशी अवस्था झाल्याचे समोर आलेय.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र या मुद्द्यावरून संघाच्या प्रतिक्रियेवर वेगळाच narrative set करायचा प्रयत्न मराठी माध्यमांनी चालविल्याचे आज समोर आले. महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवायचा निर्णय घेतला. मात्र हिंदीची सक्ती केली, असा दावा करत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. फडणवीस सरकारने तो अध्यादेश मागे घेतला. त्यामुळे आपला विजय झाल्याचा दावा करून ठाकरे बंधूंनी ऐक्य मेळावा घेतला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला. त्यावरून हिंदी सक्ती आणि राज्यांच्या भाषांवरचे प्रेम या विषयावर वेगळेच राजकारण सुरू झाले.
महाराष्ट्रातले भाजपवाले ठाकरे बंधूंची दादागिरी नाकारतात, पण ते हिंदी भाषकांची मस्तवाल मुजोरी का खपवून घेतात??, असा सवाल महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भाजपवाल्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आणि वक्तव्यातून समोर आलाय.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदावरी मातेची नित्य महाआरती पावसाळ्यातही अखंड सुरू ठेवण्याची परंपरा यंदाही पाळली गेली. काल नाशिकमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असतानाही ११ समर्पित गोदासेवकांनी पुराच्या पाण्यात उभे राहून महाआरती संपन्न केली.
ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा आशिष शेलार यांनाच पहिला राजकीय धोका, म्हणून केली हीन पातळीवर जाऊन टीका!!, असे आज घडले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री आशिष शेलार यांनी मनसेवर टीका करताना मनसैनिकांची तुलना पहलगाम मधल्या जिहादी दहशतवाद्यांशी केली. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारले तुम्ही भाषा विचारून हिंदूंना मारताय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.
जुगाडाच्या पलीकडे जाऊन बांधावी लागेल मोठी संघटना, तरच ओलांडता येईल ठाकरे – पवार ब्रँडची संख्यात्मक मर्यादा!! ही वस्तुस्थिती दोन्ही नावांच्या ब्रँडला आता मान्य करावी लागेल.
ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या मराठीच्या लढ्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळकमचे प्रमुख एम. के. स्टालिनने पाठिंबा दिला. पण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सनातन धर्माला दिलेल्या शिव्या महाराष्ट्र ठाकरे बंधूंना चालतील का?? महाराष्ट्र ते खपपून घेईल का??, हे खरे कळीचे सवाल आहेत.
महापालिकाच काय, पण राज्य ताब्यात घेण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र; त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले अजितदादा मात्र झाले माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष!!, असा विलक्षण राजकीय योगायोग आज घडला.
ठाकरे बंधूंची दोन राष्ट्रीय पक्षांना टिचकी; पवारांच्या राष्ट्रवादी सकट छोटे प्रादेशिक पक्ष घेतले पंखाखाली!!, हे 5 जुलै 2025 च्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचे वैशिष्ट्ये ठरले.
आगे हुसेन, पीछे हसन; बीच मे जगा मिली तो मै भी घुसन!!, अशा स्टाईलने ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची एन्ट्री घडवून आणली.
मराठीचा मुद्दा उचलून ठाकरे बंधू एकत्र येण्याची वातावरण निर्मिती तर चांगली झाली. ठाकरे बंधू या मेळाव्यात युतीची घोषणा करणार की नाही याविषयी देखील चर्चा झाली. पण काही झाले तरी युती होणे किंवा न होणे हा भविष्यातला थोडा दीर्घकालीन भाग झाला. त्याआधी ठाकरे बंधूंच्या पुढे पहिले आव्हान आहे, ते शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमधली गळती रोखायचे!!
ठाकरे बंधूंच्या ऐक्याला महायुतीच्या नेत्यांचा भरपूर मुद्द्यांचा इंधनपुरवठा महाविकास आघाडीचा होणार साफ सुपडा!!, अशीच खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झालीय.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App