दिल्लीत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राजधानीतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक संथ झाली
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता अधिकच चिघळला असून, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडीया’ या टिप्पणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ई-20 पेट्रोल धोरणाच्या नावाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले कथित डीपफेक व्हिडीओ, मॉर्फ केलेली छायाचित्रे, मीम्स आणि बदनामीकारक मजकूर तत्काळ हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत अॅनॉलॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.
बालविकास आणि महिला सक्षमीकरण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी सक्रिय योगदान देणे आवश्यक आहे.
बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
वैध थर्ड-पार्टी विमा नसलेल्या वाहनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्र सरकारला पायलट प्रकल्प राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेल्या कथित ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून कथितरित्या करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यात खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र पोलीस’ अशी अक्षरे, पोलीस किंवा लाल रंगाच्या नावाच्या पाट्या लावून फिरणाऱ्यांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सर्व विभागांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (4 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, न्यायव्यवस्था, ऊर्जा आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे झालेल्या भीषण अपघातात टीडीआरएफ (TDRF) जवान विकास लहू गोरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर करुणा मुंडे यांनी दोघांवर जोरदार टीका केली आहे.
पक्षाच्या संविधानातील बदलांबाबत अधिकृत ठराव आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची आयोगाची सूचना
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 3 ऑगस्टपासून लागू झाला असून, पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्स 2.50 रुपयांवरून 3.50 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील कर 15.50 रुपयांवरून 24 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना भाजप सोडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे.
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींवर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे.
“नीट” पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पण त्या राजीनाम्याचे श्रेय काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांना मिळण्याऐवजी कॉकरोच जनता पार्टीला मिळाले त्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ झाले
NEET परीक्षेच्या पेपर फुटीच्या निमित्ताने मोठे आंदोलन करून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने देशभर मोठा जल्लोष केला. त्यांनी अगदी विरोधकांची सुद्धा आपल्या मागे फरफट केली. धर्मेंद्र प्रधान यांना “व्हिलन” ठरवायचा त्यांचा बेत पूर्णपणे फसला. गेल्या दोन दिवसांच्या घडामोडीतून तसे दिसून आले.
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर यशस्वी झाल्याचे मानले गेले. त्या पाठोपाठ E20 जनता पार्टीचा सुद्धा उदय झाला.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर जेन झी च्या दंडात बेटकुळ्या फुटल्यानंतर जेन झी ने पुढचे टार्गेट ठेऊन वाटचाल चालू केली. त्यातूनच E20 janata party प्रसवली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट करणे चालू केले.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती आणि त्याच दिवशी शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!, या दोन समांतर राजकीय घडामोडी आज घडल्या.
संघाचा एक मंत्री गेला, संघाचा दुसरा मंत्री आला, अशा शब्दांमध्ये कम्युनिस्टांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा फुगा फोडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिरिक्त किंमत देऊन शरद पवारांची संसदेतल्या कार्यालयात भेट घेतली. त्याचा दुष्परिणाम आज दिसला. मधल्या मध्ये शरद पवारांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःकडे उपटून घेतले.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनातली पुढची धोकादायक वळणे लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज अखेर राजीनामा दिला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App