वसुबारस या पवित्र सणाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकळवाडी येथे आयोजित विशेष ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
: पवार + काँग्रेस साजरी करायला सांगताहेत काळी दिवाळी; ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर केली फटक्यांची आतषबाजी
ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे डाव, तिथे जाऊन फडणवीसांची खेळी; राष्ट्रवादी झाली “खाली”!!, ही राजकीय घडामोडी सोलापूर जिल्ह्यातून समोर आली.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आणलेले आपले 13 खासदार लोणच्यासारखे मुरवत ठेवलेत का??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांच्या राजकीय वर्तनामुळे आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर घराघरामध्ये शिवसेना पोहोचवा, महायुतीच्या योजना जनतेपर्यंत न्या
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होण्याअगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांबरोबर निवडणूक आयोगाकडे जाऊन रडगाणे गायले.
महाविकास आघाडीचे नेते गेले निवडणूक आयोगाकडे पण महायुतीचे नेते पोहोचले पक्षांच्या बैठकांमध्ये आणि नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये!!, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन समांतर घडामोडी घडल्या.
एकीकडे अजितदादांची स्वबळाची तयारी; पण आमदार संग्राम जगताप यांना आवरता येई ना म्हणून झाली गोची!!, अशी अवस्था अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालीय.महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाची खुमखुमी आली. ती प्रफुल्ल पटेल आणि अनिल भाईदास जगताप यांच्या तोंडून बाहेरही पडली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एवढी तोकडी की त्यांना पुणे जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिका यापलीकडे फारसे स्थानही नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा; पण त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठे उठतोय ओरखडा??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यामुळे आली.
नोबेल शांतता पुरस्काराची अमेरिकेच्या उतावळ्याला हुलकावणी; त्याच्या ऐवजी व्हेनेझुएलाच्या महिला कार्यकर्तीने घातली पुरस्काराला गवसणी!!, असे आज घडले.
महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रात पवारांच्या कुटुंबीयांनी जे राजकीय वर्चस्व निर्माण केले, ते काँग्रेस पक्ष मोडून काढू शकला नाही. पण सत्ताधारी भाजपने मात्र त्या वर्चस्वाला व्यवस्थित सुरुंग लावला.
पवित्र गोदावरीच्या तीरावर आज श्रद्धा, करुणा आणि भक्तिभावाने ओथंबलेला एक अद्भुत क्षण साकार झाला. साडेतीनशेहून अधिक जैन माता-भगिनींच्या उपस्थितीत गोदावरी महाआरतीचा अलौकिक आणि भावस्पर्शी सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
रशिया – युक्रेन आणि भारत – पाकिस्तान यांच्यातले विरेनात युद्धाचे ढग; तरीही उतावळ्याच्या गळ्यात नोबेलचे पदक!!, असला प्रकार समोर आला.
सरन्यायाधीशांवरच्या बूट फेकीला देऊन राजकीय हवा काँग्रेस आणि पवारांचे नेते पोळ्या भाजताहेत पाहा!!, असला प्रकार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांपासून ते राजधानी नवी दिल्लीपर्यंत दिसून आला. तीन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर 72 वर्षीय वकील राकेश भूषण यांनी भर कोर्टात बूट फेकला. त्यामुळे देशभर मोठी खळबळ उडाली. संपूर्ण देशभरातून राकेश भूषण यांचा सार्वत्रिक निषेध झाला. सुप्रीम कोर्टाच्या बार कौन्सिलने राकेश भूषण यांच्यावर कारवाई केली. परंतु, खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राकेश भूषण यांच्याविरुद्ध कुठलीही कायदेशीर पोलीस तक्रार दाखल केली नाही.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांचे आर्थिक सल्लागार रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन या जोडगोळीला भारतीय उद्योगपती यांच्यापासून ते जागतिक बँकेपर्यंत सगळ्यांनीच जोरदार चपराक हाणली आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करून एका वयोवृद्ध वकिलाने त्यांच्यावर बूटाने हल्ला करायचा प्रयत्न केला. त्यामुळे आज दिवसभर राजकीय वर्तुळाचे चर्चेचा विषय ठरला.
मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??, असा सवाल मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे समोर आला. गेल्या काही दिवसांमधला घटनाक्रम आणि मनोज जरांगे यांची आजची शरद पवारांवर थेट टीका यामुळे राजकीय संशय अधिक गडद झाला.
युतीत सडले, आघाडीत बळी ठरले; पण सगळीकडे खाऊन पिऊन हे समजायला उद्धव ठाकरे यांना 35 वे वर्ष का लागले??, असे विचारायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या आजच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे आली.
बिहारची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे संघ आणि भाजपवर जोरदार टीका करणारी भाषणे केली.
मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज दसरा मेळाव्यात भाषण करताना मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बनायला सांगितले.
दसरा मेळाव्यांची सीमोल्लंघने; राजकीय लाभासाठी भाषणांची पारायणे!!, असेच आजच्या दसऱ्याच्या राजकीय मेळाव्यांचे वैशिष्ट्य ठरले. सकाळी झालेला संघाचा मेळावा हा शताब्दी मेळावा ठरला. त्यामध्ये संघ + सेवाभाव + समर्पण या विषयावर अधिक चर्चा झाली. त्याचबरोबर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्या प्रचलित झालेल्या आर्थिक नीतीचा फेरविचार करायचे आवाहन सरकारसह सर्व समाजाला केले कारण सध्याच्या प्रचलित अर्थनितीत शोषकांना शोषणाचा सुरक्षित अधिकार देण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे गंभीर निरीक्षण त्यांनी नोंदविले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त देशभरात आणि जगभरात असंख्य कार्यक्रम होत असताना त्या संघटने विषयी विविध पातळ्यांवर प्रचंड मंथन सुरू आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त देशभर आणि जगभरात अनेक कार्यक्रम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजधानी नवी दिल्लीतल्या संघ शताब्दीच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
देशाच्या इतिहासात प्रथमच भारत मातेची तस्वीर शंभर रुपयांच्या नाण्यावर छापण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नाण्याचे अनावरण केले.
राहुल गांधी आणि शरद पवारांच्या सकट लिबरल लोकांनी Gen Z च्या पोरांवर ठेवला भरवसा; पण त्या पोरांनी JNU मध्ये फडकवला संघाचा झेंडा!!, असला प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने घडलेला समोर आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App