विशेष

Thackrey – Pawar : ठाकरे बंधू आणि पवार काका – पुतण्याला भाजपच्या ताकदीची भीती; त्याहीपेक्षा दोन्ही कडच्या नेत्यांना एकत्र येण्याची धास्ती!!

ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या यांना भाजपच्या वाढत्या ताकदीची भीती वाटते आहे, पण त्याहीपेक्षा दोन्हीकडच्या नेत्यांना एकत्र येण्याची जास्त धास्ती वाटते आहे.

सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पक्षातून हाकालपट्टी केलेले नाशिक मधले नेते सुधाकर बडगुजर यांची भाजप मधली संभाव्य एन्ट्री म्हणजे आपल्या पुढच्या राजकारणाला धोका आहे

Howard lutnick

रशिया – भारत संबंध आणि BRICS वरून अमेरिकेचा थयथयाट; पण भारताकडून अपेक्षा काय??

रशिया आणि भारत यांच्या संबंधांवरून आणि BRICS राष्ट्रसमुहाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने भारताविरुद्ध थयथयाट चालविला. ट्रम्प प्रशासनातले व्यापार मंत्री हावर्ड ल्युटनिक यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखीच उथळ भाषा वापरून भारतावर दुगाण्या झाडल्या. तुम्ही रशियाकडून शस्त्रे विकत घ्या. “ब्रिक्स” देशांच्या समूहात सामील राहा.

CJCSC

याला म्हणतात, तंगड्या वर; पाकिस्तानी लष्कराची “लघुशंका” अमेरिका, चीन आणि तुर्कांच्या मदतीवर!!

याला म्हणतात, तंगडी वर; पाकिस्तानी लष्कराची लघुशंका अमेरिका, चीन आणि तुर्कांवर!!, असे म्हणायची वेळ पाकिस्तानी सैन्य दलांच्या प्रमुखाच्या मुलाखतीने आणली. भारत अशी लढाई करताना पाकिस्तानने कुठल्याही आपल्या देशाची मदत घेतली नाही, असा अजब दावा पाकिस्तानी सैन्य दलांचा प्रमुख जनरल साहीर शमशाद मिर्झा याने बीबीसी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. ही मुलाखत पाकिस्तानी माध्यमांनी ठळकपणे छापली.

Rahul Gandhi

नरेंदर – सरेंडर, थंडर – ब्लंडर : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले यशस्वी; काँग्रेस – भाजपने मात्र शाब्दिक खेळात अडकवली लढाई!!

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले यशस्वी; पण काँग्रेस आणि भाजप यांनी मात्र शाब्दिक खेळत अडकवली लढाई!! असला प्रकार राहुल गांधींच्या भाषणानंतर आज घडला.

CDS Anil Chauhan

CDS Anil Chauhan : भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली, युद्ध थांबवायची विनंती करणारा फोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला!!

Operation Sindoor मध्ये भारतीय सैन्याची कारवाई एवढी अचूक आणि प्रखर होती, की भारताने 48 तासांची लढाई आठ तासांमध्ये संपवली होती.

Rahul Gandhi and Jairam Ramesh : राहुल गांधी + जयराम रमेश यांना संघाचे दिसले “कुसळ”; पण दिसले नाही काँग्रेसच्याच आशीर्वादाने कम्युनिस्टांनी सरकारी संस्थांमध्ये घुसवलेले “मुसळ”!!

राहुल गांधी आणि जयराम रमेश यांना संघाचे दिसले “कुसळ”, पण दिसले नाही काँग्रेसच्याच आशीर्वादाने कम्युनिस्टांनी सरकारी संस्थांमध्ये घुसवलेले “मुसळ”, असे म्हणायची वेळ जयराम रमेश यांच्या वक्तव्याने आली.

Rahul Gandhi

राहुल गांधींनी केली होती चिनी ड्रोनची भलामण; पण आता त्यांनी drone warfare चा इशारा दिल्याचे काँग्रेसचे सादरीकरण!!

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ सादर करून चिनी ड्रोन तंत्रज्ञानाची भलामण केली होती, पण आता त्याच व्हिडिओतले काही अंश सादर करून राहुल गांधींनी drone warfare चा किती गंभीर इशारा दिला, होता, अशा स्वरूपाचे सादरीकरण काँग्रेसने आज केले.

Mohammad Yunus : बांगलादेशी नोटांवर हिंदू मंदिर आणि बुद्ध विहाराचा फोटो छापून मोहम्मद युनूस हिंदू हत्याकांडाचे पाप धुवून काढू शकेल??

बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने आपली सत्तेवरची पकड मजबूत करताना वेगवेगळे हातखंडे वापरले.

अजितदादांच्या पक्षात मोठी “महागाई”, ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!

अजितदादांच्या पक्षात मोठी “महागाई”; ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!, हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण खुद्द अजितदादांच्या वक्तव्याची चिकित्सा केली की त्याचे प्रत्यंतर येऊन ते पटायलाही लागेल. Ajit Pawar NCP

नोबेल पुरस्कार विजेत्याचा हिंसक चेहरा; शेख हसीनांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा घातक इरादा!!

बांगलादेशातल्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थतज्ञ हिंस्र राज्यकर्त्याचा शेख हसीना यांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा बेत असल्याचा डाव समोर आला आहे.

Ajit Pawar

पुण्यात अजितदादांना limited options, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटल्या तव्यावर; भाजपला walk over!!

पुण्यामध्ये अजितदादांना लिमिटेड ऑप्शन्स, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटून टाकल्या तव्यावर!! अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अवस्था झाली. जमीन खरेदी व्यवहारात महाराष्ट्र सरकारला फसवण्याच्या मुद्द्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर अजित पवारांना संपूर्णपणे शहरासाठी एक शहराध्यक्ष सापडला नाही. त्यामुळे अजितदादांनी पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमून पक्षांतर्गत अधिकाराची विभागणी केली.

Congress : पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा; भारतात मात्र आत्मवंचनेची लागलीये स्पर्धा!!

पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा भारतात मात्र आत्मा वंचनाची लागलीये स्पर्धा!! अशी ऑपरेशन सिंदूर नंतर आजची अवस्था आहे.

Ajit Pawar NCP इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या पक्षांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला!!

इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला. महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये एकाच वेळी या घडामोडी घडल्या.

General Anil Chauhan

पाकिस्तानने किती राफेल पाडली??, विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS ने सांगितले भारत पाकिस्तान पेक्षा सर्वच क्षेत्रांत प्रबळ!!

पाकिस्तानने किती राफेल विमाने पाडली??, हे विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS नी सांगितले, भारत पाकिस्तान पेक्षा सगळ्यांचं क्षेत्रांत प्रबळ!! हे कालच्या दिवसातल्या सगळ्या बातम्यांचे सार राहिले.

Congress convert

ऑं… अख्खी काँग्रेसच मोजणी कारकूनांच्या संघटनेत convert झाली की काय??

आत्तापर्यंत काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असल्याचे मानले जात होते. कारण काँग्रेसने आतापर्यंत देशात किमान 55 ते 60 वर्षे राज्य केले. देशाला 7 पंतप्रधान दिले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजूनही राज्य करत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत मान्यतेनुसार काँग्रेस अजूनही देशातला मोठा राजकीय पक्ष आहे.

राष्ट्रवादीच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, आता पवारांचे कानावर हात; पण खरे कारण काय??

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, पण आता शरद पवारांनी स्वतःच ठेवलेत कानावर हात!! बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही

कुछ तो बडा होने वाला है!!; भारत आता पुढच्या कारवाईसाठी दहशतवादी हल्ल्याची वाट पाहात बसेल का??

जम्मू – कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये mock drill ठरवून त्याची तारीख केंद्र सरकारने बदलून ती आज 31 मे 2025 अशी केली.

Ajit Pawar NCP

कोर्टात + माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघताहेत वाभाडे; तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!

कोर्टात आणि माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघतात वाभाडे, तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!

Mohammed Younus नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञाची बांगलादेशात चालूगिरी, देशाला सोडून वाऱ्यावर केली स्वतःच्या ग्रामीण फॅमिलीच्या कंपन्यांची भांडवल भरती!!

लोकशाहीवादी, बांगलादेशातल्या ग्रामीण जनतेचा मसीहा असे मुखवटे धारण करणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञाने बांगलादेशात पुरती चालूगिरी केली देशावर दिले सोडून वाऱ्यावर आणि स्वतःच्या ग्रामीण फॅमिलीच्या कंपन्यांची मात्र भांडवल भरती केली.

Congress : ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना दिसले, पण पाकिस्तानचे याचनाकर्ते पंतप्रधान पाहायचे म्हटल्याबरोबर त्यांचे डोळे फुटले!!

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवले असे ट्रम्प आठ वेळा म्हणाल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना दिसले. त्यांनी मोदी सरकारला वारंवार टोचले.

ट्रम्प आठ वेळा बोलले, मोदींनी कोलले; पण ट्रम्पचे भारतीय प्रवक्ते अजून का उड्या मारताहेत??

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवून आणले, असे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी आठ नाही

Omar Abdullah

उमर अब्दुल्लांनी दाखवले “खायचे दात”; म्हणाले, सुरक्षेची जबाबदारी काश्मीरच्या लोकनियुक्त सरकारची नाही, तर ती तिघांची!!

पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर सगळा देश पाकिस्तानच्या विरोधात एकवटला भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हल्ले करून तिथली नऊ दहशतवादी केंद्रे नष्ट करून टाकली. पाकिस्तानच्या हवाई दलाला पांगळे केले.

अजितदादांच्या कुरघोड्या; अमित शाहांचा भाजप आमदारांना संख्याबळावर रेटून काम करून घ्यायचा सल्ला; पण फडणवीसांनीही आमदारांना बळ देणे अपेक्षित!!

जातील तिथे मित्र पक्षांवरच अजितदादांच्या कुरघोड्या म्हणून भाजप आमदारांनी अमित शहांपुढे वाचला तक्रारीचा पाढा, पण अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना मोठ्या संख्याबळावर रेटून काम करवून घ्यायचा सल्ला दिला.

Savarkar and Nehru

सावरकर आणि नेहरूंच्या विचार भेदांची नेहमीच चर्चा, पण दोघांच्या विचारांमध्ये काही साम्य; पण सध्या नेहरूंचा शिक्का पुसून सावरकरांचा विचार ठळक!!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या सध्याच्या राजकारणात दोन परस्पर विरोधी टोके मानले जातात. नेहरू विरोधी विचार म्हणजे सावरकर आणि सावरकर विरोधी विचार म्हणजे नेहरू, असे समीकरण या दोघांचेही अनुयायी मांडतात, पण प्रत्यक्षात सावरकर आणि नेहरू यांच्यात अनेक मुद्द्यांवर गंभीर मतभेद असले, तरी त्यांच्या काही विचारांमध्ये विलक्षण साम्य होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक “गांधीय” नेत्यांपेक्षा नेहरू आणि सावरकर यांचे विचार अधिक आधुनिक आणि काळाशी सुसंगत होते.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात