विशेष

Pawar uncle

पवार काका – पुतण्यांना एकमेकांच्या कुबड्या हव्यात; नाहीतर स्वबळावर लढल्यास दोघेही जातील तोट्यात!!

पवार काका – पुतण्यांना एकमेकांच्या कुबड्या हव्यात; नाहीतर स्वबळावर लढल्यास दोघेही जातील तोट्यात!!, हेच राजकीय वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले. पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींना महाराष्ट्राच्या जनतेची किंवा 5 % सुद्धा पसंतीची पावती मिळाली नाही. सगळा महाराष्ट्र तळहातावरच्या रेषांप्रमाणे ओळखणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेने फक्त 3 % पसंती दिली. यातून पवारांचा संपूर्ण महाराष्ट्रव्यापी नेतृत्व करण्याचा दावाही फोल ठरला.

Prashant Jagtap

शरद पवारांकडून कोणी वदवून घेऊ शकत नाही; जयंत पाटलांचा प्रशांत जगतापांच्या वक्तव्याला छेद

पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही. त्याऐवजी पुण्यात महाविकास आघाडी एकत्र येऊनच निवडणूका लढवायच्या या धोरणाला शरद पवारांनी मान्यता दिली, असा दावा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला होता. परंतु, प्रशांत जगताप यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छेद दिला.

हुमायून कबीर यांनी बाबरी मशिदीची केली पायाभरणी; पण ही तर ममतांच्या राजकारणाची दुटप्पी नीती!!

पश्चिम बंगाल मधले आमदार हुमायून कबीर यांनी सहा डिसेंबरला आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांग मध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केली. पण यातून ममता बॅनर्जींच्या दुटप्पी राजकारणाची नीतीच समोर आली.

प्रशांत जगताप यांचं पवारांनी ऐकलं??; पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नाही??

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचं म्हणणं पवारांनी ऐकलं??; पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नाही??, असा सवाल विचारायची वेळ प्रशांत जगताप यांच्याच आजच्या वक्तव्याने आली.

Ajit Pawar NCP

पृथ्वीराज बाबांनी लावलेले जाळे फडणवीस यांनी तोडले; पण मुख्यमंत्रीपदासाठी हावरट झालेली राष्ट्रवादी त्यात अडकली!!

लवकरच मराठी पंतप्रधान होईल असे वक्तव्य करून पृथ्वीराज बाबांनी लावलेले जाळे देवेंद्र फडणवीस यांनी तोडले, पण मुख्यमंत्री पदासाठी हावरट असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्यात अडकली. हे राजकीय चित्र आज समोर आले.

Putin

Putin : द फोकस एक्सप्लेनर : पुतिन यांची भारताला दोस्तीची हमी आणि पश्चिमेला बदलत्या शक्ती-संतुलनाचे संकेत

जागतिक राजकारणात अलीकडे अनेक बदल दिसत आहेत. अमेरिका, युरोप, चीन, भारत, मध्य पूर्व—या सर्व प्रदेशात नवी घडामोडी घडत आहेत. अशा वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलेले इंटरव्यू विशेष लक्षवेधी ठरते. या मुलाखतीतील दहा मुद्दे केवळ रशियाचे विचारच मांडत नाहीत, तर सध्या जग कशा दिशेने जात आहे याचेही संकेत देतात.

Russia

Putin India visit : भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ; व्यापारी तूट भरून काढायचे आव्हान भारत पेलणार कसे??

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर पोहोचत असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे.

पुतिन भारतात पोहोचताच पंतप्रधान मोदींनी घेतली गळाभेट; विमानतळावर स्वागत, दोन्ही नेते एकाच गाडीत बसले

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि पुतिन यांनी विमानतळावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत एकाच गाडीने प्रवास केला.

modi putin

पुतिन यांच्या बहुचर्चित दौऱ्यातून भारताची अपेक्षा काय??, मिळणार काय??

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर जाण्याची अपेक्षा असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांची सरकारी आणि प्रशासने त्या दृष्टीने तयारी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही दबावाखाली काम नाही करत; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा निर्वाळा; ट्रम्पच्या दाव्यांना टोला!!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुणाच्याही दबावाखाली बिलकूल काम करत नसल्याचा निर्वाळा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांनी दिला.

ममतांना सुद्धा बाबरीची धास्ती; मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी; एक नवा राजकीय डाव!!

एरवी मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या ममता बॅनर्जींनी सुद्धा बाबरीची धास्ती घेतली. पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची त्यांनी तृणमूळ काँग्रेस मधून हकालपट्टी करून टाकली.

जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने पार्थ पवारला बहारीनला नेऊन तिथेच सेटल करण्याचा डाव??

जय पवारच्या लग्नाच्या निमित्ताने जमीन घोटाळ्यातल्या संशयित पार्थ पवारला बहारीनला नेऊन तिथेच सेटल करण्याचा डाव अजित पवारांनी आखला आहे का??, असा सवाल आता तयार झाला आहे.

Godavari

गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ; क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे नाशिक महापालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘विकास भी और विरासत भी’ आणि 2027 ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत “क्लीन गोदावरी” कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच स्वच्छ पाणी अखंड वाहत राहील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे नाशिक महापालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘विकास भी और विरासत भी’ आणि 2027 ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत “क्लीन गोदावरी” कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच स्वच्छ पाणी अखंड वाहत राहील.

Sheetal Tejwani

पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात शितल तेजवानीला अटक; पार्थ अजून मोकळाच!!

पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात पोलिसांनी शितल तेजवानीला मुख्य आरोपी बनवले असून तिला आज अटक केली पण पार्थ पवार अजून मोकळाच राहिला. मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये, प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची या आधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई केली.

कुत्र्यापायी सत्ता गेली, तरी काँग्रेस नेत्यांची जिरली नाही मस्ती; कॅमेऱ्यासमोर भुंकल्या रेणुका चौधरी!!

कुत्र्यापायी सत्ता गेली, तरी काँग्रेस नेत्यांची जिरली नाही मस्ती; कॅमेऱ्यासमोर भुंकल्या रेणुका चौधरी!!, असेच चित्र संसदेच्या परिसरात दिसले.

Epstein

Epstein सारख्या किती फाईल्स आणि रिपोर्ट्स आले आणि गेले; पण…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या स्वभावाच्या विपरीत एक राजकीय पुडी महाराष्ट्राच्या राजकीय हवेत सोडली आणि अमेरिकेतली एक फाईल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली. तिचे नाव Epstein file. या फाईल मध्ये जगभरातल्या आणि भारतातल्या अशा काही नेत्यांची नावे आहेत, की ती जर पुढच्या महिन्याभरात बाहेर आली तर भारताच्या राजकारणात भूकंप घडून थेट पंतप्रधान बदलावे लागतील, असे भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुद्धा याच स्वरूपाचे भाकीत करून ठेवले. पृथ्वीराज चव्हाण यांनी Epstein file चे निमित्त करून मराठी नेत्यांना पंतप्रधान पदाचा मधाचे बोट चाटविले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांना पृथ्वीराज चव्हाण यांनी पेरलेल्या बातमीची दखल घ्यावी लागली.

संघाने ज्यांच्याशी संवाद साधला, त्या मौलानाने पत्रकारालाच मुसलमान बनायला सांगितले!!; याचा नेमका अर्थ काय??

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या Muslim outreach मध्ये ज्यांनी भाग घेतला, संघाने ज्यांच्याशी संवाद साधला, त्या मौलानानेच मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मुसलमान बनायला सांगितले.

Prithviraj Chavan

म्हणे, मराठी माणूस पंतप्रधान!!, पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला सुद्धा का सोडावीशी वाटली पुडी??

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरू असताना मध्येच मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या बाता सुरू झाल्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या धीरगंभीर नेत्याने ही पुडी महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत सोडली. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या Epistine files चा हवाला देऊन डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्याचे पडसाद भारतातून उमटून मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असा बादरायणी संबंध जोडला.

युगेंद्र पवारांच्या लग्नात नाताळच्या घंटांचे डेकोरेशन; सुप्रिया सुळे यांनी केले फोटो शेअर!!

एकीकडे महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकींची रणधुमाळी उडाली असताना दुसरीकडे मुंबईत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा हाय प्रोफाईल विवाह सोहळा निवडक आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.

22 नगराध्यक्षांच्या हाय प्रोफाईल निवडणुका अचानक पुढे ढकलल्या; पण विरोधकांकडून साधा आवाजही नाही!!

महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने वेगवेगळी कायदेशीर कारणे देऊन महाराष्ट्रातल्या 22 नगराध्यक्षांच्या हाय प्रोफाईल निवडणुका अचानक पुढे ढकलल्या.

पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??

महाराष्ट्रातील नगरपंचायती, नगरपालिकांची निवडणूक शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी “सोडून” दिली.

अहमद पटेलांचे चिरंजीव काँग्रेस फोडायला तयार; वडिलांच्या नावाने नवी काँग्रेस स्थापणार!!; पण पक्ष चालणार किती आणि कसा??

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लवकरच काँग्रेसमध्ये फूट पडेल असे राजकीय भाकीत केले होते.

Eknath Shinde

दक्षिण – पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचा झंझावात; पवारांच्या राष्ट्रवादीने रिकाम्या केलेल्या political space मध्ये शिरकाव!!

दक्षिण पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला होता. सांगली जिल्ह्यात काही प्रमाणात काँग्रेसची ताकद होती. पण नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातून फारसा प्रतिसादच मिळाला नाही. पवारांनी सुद्धा या निवडणुकीतला रस काढून घेतला त्यामुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात एक मोठी पॉलिटिकल स्पेस निर्माण झाली त्या पॉलिटिकल स्पेस मध्ये बाकी कुठल्याही पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जास्त शिरकाव केल्याचे चित्र समोर आले.

Sharad Pawar

पुणे जिल्ह्यातच पवारांच्या राष्ट्रवादीने टाकली नांगी; दोन खासदार असूनही नगरपरिषदांच्या निवडणुकीत उडाली दांडी!!

राज्यातल्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असताना पुणे जिल्ह्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नांगी टाकली. एकेकाळी फक्त पवार आणि पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार असून सुद्धा स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने आत्मविश्वास गमावला. म्हणूनच दोन-तीन ठिकाणचा अपवाद वगळता पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊ शकली नाही.

Ajit Pawar NCP

तटकरे म्हणतात, दोन डिसेंबर नंतर सुद्धा राष्ट्रवादीची भाजपलाच साथ; त्यांना दुसरा पर्याय तरी आहे का??

राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान 2 डिसेंबरला होईल. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचे भाकीत अनेकांनी वर्तविले. दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असे वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात