बांगलादेश बॉर्डर वरचे कुंपण ममता बॅनर्जींच्या सरकारने अडवले मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी खेळले!! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जींचे डाव एक्सपोज केले. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 गुरुवारी लोकसभेने मंजूर केले. या विधेयकावरील चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परखड उत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घडीला भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
पश्चिम बंगाल वर एकेकाळी निर्विवाद सत्ता गाजवलेला कम्युनिस्ट पक्ष गेल्या कित्येक वर्षात झोपी गेला होता. तो आता विद्यार्थ्यांच्या रूपाने “जागा” झाला. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सिलिगुडी मध्ये मोठे आंदोलन केले, पण ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी ते आंदोलन मोडून काढताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना झोडपून काढले
सार्वजनिक मालमत्ता कायद्याच्या कथित उल्लंघनाबाबतच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला
ओडिशामध्ये, काँग्रेसने गुरुवारी त्यांच्या सर्व १४ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध निषेध केला. कार्यकर्ते विधानसभेला घेराव घालण्यासाठी त्या दिशेने जात होते. यादरम्यान त्याची पोलिसांशी झटापट झाली.
हातात लाल संविधान घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर “गद्दार” विडंबन काव्य करून मुंबई बाहेर पळून गेलेल्या लाल संविधानी कुणाल कामराची फाटली
जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा प्रकल्प उभा करणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आणि दोन दहशतवादी ठार झाले. याशिवाय तीन दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
केंद्र सरकार २०२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) बाजारातून ८ लाख कोटी रुपये कर्ज घेईल. हे संपूर्ण वर्षाच्या कर्ज लक्ष्याच्या (₹१४.८२ लाख कोटी) ५४% आहे.
गुरुवारी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५ मंजूर करण्यात आले. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “रोहिंग्या असोत किंवा बांगलादेशी, जर ते भारताला हानी पोहोचवण्याच्या मानसिकतेसह आले तर त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल.”
केरळच्या कलिकत विद्यापीठात काळे फुगे, सावरकर विरोधात SFI ची निदर्शने; राज्यपालांनी धू धू धुतले!!
मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे, शिवाजीनगर पोलिस स्टेशन आणि सीआरपीएफ पथकाने त्यांना पकडले आहे. पकडलेल्यांपैकी कोणीही भारतीय असल्याचा पुरावा देऊ शकत नव्हता. सध्या पोलिस सर्वांची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी लोकसभेत काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका केली आणि ते औरंगजेबाबद्दल बोलतात, म्हणून त्यांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ नसून ‘औरंगजेब फॅन क्लब’ असावे असे म्हटले. तर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.
भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही, की कोणीही येऊन इथे बसावं, अशा परखड शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना ठणकावले.
कॉमेडियन कुणाल कामराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. गेल्या ५ दिवसांत कुणाल कामराचा हा तिसरा व्हिडिओ आहे. २६ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये कुणाल कामराने मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे.
भारताच्या शेजारील देश बांगलादेशमधील परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना पत्र लिहिले आहे.
पश्चिम बंगालमधील भाटपारा येथे भाजप नेते आणि माजी खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्ब फेकले
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि भारत यांच्यातील संबंधांबाबत मोठे विधान केले आहे. २०२० मध्ये गलवान व्हॅली संघर्षानंतर सुरू असलेल्या तणावानंतर दोन्ही देश त्यांचे संबंध पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे एस जयशंकर यांनी बुधवारी सांगितले. तणावपूर्ण संबंध कोणत्याही देशासाठी फायदेशीर ठरणार नाहीत असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.
भाजपला दुर्गंध पसंत म्हणून ते गोशाळा बांधतात, अशी मुक्ताफळे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उधळली, तर समाजवादी पार्टी आता अंताच्या निकट आली आहे
देशातील प्रशिक्षित कामगारांच्या मदतीने सहकारी चळवळीला गती देण्याचा मार्ग मोकळा झाला. लोकसभेत चर्चेनंतर आवाजी मतदानाने त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक मंजूर झाले.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका उत्तरात सांगितले की, भारतमाला परियोजनेअंतर्गत येणाऱ्या ६३७ प्रकल्पांना भूसंपादन समस्या आणि कंत्राटदारांना येणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे विलंब होत आहे.
बुधवारी (२६ मार्च) सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की, सर्व सरकारांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्धच्या तक्रारी ऐकण्यासाठी २ महिन्यांच्या आत एक प्रणाली तयार करावी.
“लाल संविधानी” कुणाल कामराचा “केजरीवाल” होत चाललाय; कायद्याच्या जाळ्यात येण्यापूर्वी मासा फडफडत राहिलाय!! अशीच कुणाल कामराची अवस्था होत चालली असल्याचे दिसते.
भाजपचे दिल्ली सरकार तिहार तुरुंग शहराबाहेर हलवण्याची योजना आखत आहे. २५ मार्च रोजी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी २०२५-२६ साठी दिल्लीसाठी १ लाख कोटी रुपयांचे बजेट सादर केले, ज्यामध्ये त्यांनी तिहार हलवण्याबद्दल बोलले.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडल्याच्या प्रकरणासंदर्भात बुधवारी पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. वृत्तानुसार, डीसीपी नवी दिल्ली देवेश यांच्या पथकाने पैसे मिळालेल्या स्टोअर रूमला सील केले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App