सध्या पाकिस्तानवर वॉटर स्टाइक आणि पॉलिटकल स्टाइक झाला आहे आणि पाकिस्तानची भीतीही समोर आली आहे. मात्र पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, २४ तासांत दुसऱ्याता नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला आहे. तर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शुक्रवारी (२५ एप्रिल) हैदराबादमध्ये कँडल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि इतर अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी, दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्राला पाठिंबा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्याचे आवाहनही केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान संबंध खूपच कटुतेच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. दरम्यान, पूर्व भारतात, सैनिकांनी लाल दहशतवादाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे.
भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको, अशा स्पष्ट सूचना माहिती प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यात
केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल केले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, १९२३ पासून, वक्फ बाय युजर तरतुदी अंतर्गत नोंदणी अनिवार्य झाल्यानंतर, त्याचा गैरवापर केला जात आहे आणि खासगी आणि सरकारी मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. हे थांबवणे आवश्यक होते.
पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्याच्या सूचना केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १५ व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रे वाटप करतील.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः सगळ्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक शोधून काढून त्यांना त्यांच्या देशात पाठवायच्या सूचना केल्या. त्यापाठोपाठ अहमदाबाद पोलीस ॲक्शन मध्ये आले.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा आणि अमेरिकन उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचा भारत दौरा यांचे “पॉलिटिकल टायमिंग” […]
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यास दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने नकार दिला. आरोपींची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही नोटीस बजावू शकत नाही, असे न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले. शुक्रवारी न्यायालयाने म्हटले की, आम्ही कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध बाष्कळ बोलण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि आपण त्यांच्याशी कसे वागतो आहोत?
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहलगाममध्ये इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी 28 भारतीयांची हत्या केली. त्यात त्यांनी धर्म विचारून 27 हिंदूंना गोळ्या घातल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्यास सांगितले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर सतर्क आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. येथे हिरानगर सेक्टरमध्ये एका स्थानिक महिलेने चार संशयितांना पाहिले. महिलेने ताबडतोब सुरक्षा दलांना याची माहिती दिली, त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे, त्यानंतर लष्कराने काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.
भारतीय जनता पक्ष दोन वर्षांनी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या महापौरपदावर परतला आहे. भाजपचे राजा इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर बनले आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत पोहोचले होते. सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत परतले आहेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर म्हटले आहे की, ही कोणत्याही पंथाची किंवा समुदायाची लढाई नाही. सध्या सुरू असलेला संघर्ष हा धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे. मुंबईत पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी हे सांगितले.
दिल्ली पोलिसांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना निजामुद्दीन येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाईल.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार भाष्य स्वीकारले जाणार नाही.
सेबीच्या कारवाईनंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२४ एप्रिल) जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या जागेवर छापा टाकला. दरम्यान, सह-प्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना दिल्लीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा प्रवर्तक अनमोल जग्गी दुबईमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
पहलगाम हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड घडविले. 29 हिंदूंना मारले. तिथले भयानक अनुभव सगळ्यांनी जाहीरपणे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) प्रशासकीय परिषदे’ची दुसरी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण व नवीन साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त चपराक हाणली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा कोणत्याही स्थितीत अपमान सहन करणार नाही.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App