पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याबाबत दिल्ली जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे निवेदन समोर आले आहे. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि म्हटले की, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांच्या हत्येने आपला विवेक हादरवून टाकला आहे. संपूर्ण देश या भयंकर गुन्ह्याचा एकमताने निषेध करतो.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्राने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वपक्षीय बैठक गुरुवारी (२४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ज्याचे अध्यक्षस्थान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करतील. या बैठकीत, सरकार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीची आणि सरकारने उचललेल्या पावलांची माहिती सर्व पक्षांना देईल.
जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. तत्पूर्वी, मुंबईत पार्थिव आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली होती.
मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी रायपूर विमानतळावर राहुल गांधींबद्दल म्हटले की, एक गांधी देशातील गरिबांसाठी कपडे काढून जगत होते. ते बकरीचे दूध पित असत. हे गांधी सुट्टीसाठी थायलंडला जातात. ते गांधी गायीची पूजा करायचे. हे गांधी बीफ खातात.
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या युनिट, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेली सीसीएस बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
भारतातील विमान कंपनी इंडिगोने बुधवारी सांगितले की ते पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरला जाणाऱ्या विमानांचे रद्दीकरण आणि वेळापत्रक बदलण्याचे शुल्क माफ करत आहेत.
मंगळवारी दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या आणि खासदार बांसुरी स्वराज ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विषयावरील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत ‘नॅशनल हेराल्ड की लूट’ असे लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या.
पहलगाम हल्ल्याच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही आणि सैफुल्ला खालिद उर्फ कसुरी हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याची बातमी आली आहे. तो लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आहे. हाफिज सईदचा जवळचा सहकारी कसुरी याने रेझिस्टन्स फ्रंटच्या सहकार्याने हा हल्ला केल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे.
एअर इंडिया लिमिटेड अमेरिकन कंपनी बोईंगकडून विमान खरेदी करण्याचा विचार करत आहे ज्यांच्या शिपमेंटला चिनी विमान कंपन्यांनी नकार दिला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगांमध्ये पाकिस्तानी लष्करातल्या कमांडोजने दहशतवाद्यांचा बुरखा पांघरून हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांना धर्म विचारला.
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने सोमवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. ट्रम्प प्रशासन विद्यापीठावर राजकीय दबाव आणून त्यांच्या शैक्षणिक कामकाजावर नियंत्रण ठेवू इच्छित असल्याचा आरोप विद्यापीठाने केला आहे. हार्वर्डने असा आरोप केला आहे की हे विद्यापीठाच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन करते.
२० एप्रिल रोजी अमेरिका दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाने मंगळवारी याबाबत एक निवेदन जारी केले. भारतात ज्या प्रमाणात आणि अचूकतेने निवडणुका घेतल्या जातात त्याचे जगभरात कौतुक केले जाते, असे आयोगाने म्हटले आहे.
जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची वेचून हत्या केली. त्यांना धर्म विचारला. कलमा पढायला लावला. पॅन्ट काढून त्यांचा धर्म तपासला आणि मग त्यांना गोळ्या घातल्या.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध आघाडी उघडली आहे, त्यामुळे आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. देशभरातून कडक कारवाईची मागणी होत आहे. विश्व हिंदू परिषदेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि सरकारने या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. विहिंपने २५ एप्रिल रोजी देशव्यापी निषेधाचे आवाहन केले आहे.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल, भारतीय पोलीस दल यांच्यातले अधिकारी आणि जवान एवढे संतप्त झालेत की त्यांच्या अंगाचा अक्षरशः तीळपापड झालाय.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांच्या हत्या केल्या. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तिथल्या वातावरणात कुठलाही सकारात्मक बदल झाला नाही
पहलगामनंतर उरी दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. पण लष्कराने दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडले. बुधवारी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी ठार मारले. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल आणि आयईडी जप्त करण्यात आले आहेत.
पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर याने इस्लामाबाद मध्ये हिंदू विरोधी भाषण केले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांच्या हत्या केल्या.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सहमती दर्शवली. न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणीसाठी याचिका सूचीबद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र, तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी संसद सर्वोच्च असल्याचे म्हटले. दिल्ली विद्यापीठात संविधानावर आयोजित कार्यक्रमात धनखड भाषण देत होते.
‘हमदर्द’च्या रूह अफजाबद्दल योगगुरू रामदेवांनी ‘शरबत जिहाद’ बद्दल केलेल्या विधानावर दिल्ली उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहे आणि ते अयोग्य म्हटले आहे.
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चेंबर अँड बार असोसिएशनने बुधवारी संपूर्ण बंदचे आवाहन केले आहे. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सनेही या बंदला पाठिंबा दिला आहे. पक्षाने त्यांच्या x अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला दर्शवला पाठिंबा!
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांचे हत्या केल्यानंतर ज्या पद्धतीने जगातल्या सर्व देशांच्या प्रतिक्रिया आल्या
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App