बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढील सामने १७ मे पासून सुरू होतील. आता आयपीएलचे सामने ६ ठिकाणी खेळवले जातील. त्याच वेळी, आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ थांबवण्यात आले होते, परंतु आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आहे, त्यामुळे सामने पुन्हा खेळवले जातील.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या सलग तिसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये ड्रोन दिसले. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील सांबा, पंजाबमधील जालंधर, पठाणकोट आणि राजस्थानमधील बाडमेर येथे ड्रोन दिसले.
पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पाकिस्तान आणि जागतिक समुदायाला गंभीर इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर पहिल्यांदाच केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी between the lines वाचण्यासारखे काही शिल्लकच ठेवले नाही. जे काही बोलायचे ते थेट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापाराचे हत्यार दाखवून मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध थांबविले, असा आज दावा केला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे नाव न घेता तो दावा फेटाळून लावला. Trade आणि terrorism एकत्र चालणार नाहीत अशा स्पष्ट शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून, कोहलीने त्याच्या कसोटी निवृत्तीबद्दल बीसीसीआयला माहिती दिल्याच्या बातम्या सतत येत होत्या. पण आता कोहलीने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून निरोप घेतला आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या आणखी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद जमील हमजा आहे, जो मोहम्मद अझहरचा पुतण्या होता. बहावलपूर दहशतवादी छावणीवर सैन्याने हल्ला केला तेव्हा हमजा मारला गेला.
व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत आणि पाकिस्तान मधले अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते
भारतीय सैन्याला लवकरच आणखी एक मोठी ताकद मिळणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुढील महिन्यात १८ जून रोजी EOS-०९ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहाला RISAT-1B असेही म्हणतात.
भय बिनु होइ न प्रीति.. रामचरितमानस मधील ही चौपाई म्हणजे एक संदेश. प्रेम हवे असेल तर भीती आवश्यक आहे. जो नम्रतेला प्रतिसाद देत नाही, त्याला ताकद दाखवावीच लागते, असे सांगत एअर मार्शल ए. के. भारती यांनी पाकिस्तानला इशाराच दिला.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये बऱ्याच काळापासून तणाव आहे. आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असूनही, सुरक्षा दल पूर्ण सतर्कतेने तैनात आहेत. तथापि, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर अनेक विमानतळे उघडण्यात आली आहेत. देशातील ३२ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी खुले करण्यात आले आहेत.
भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमधील अपेक्षित चर्चेपूर्वी तिन्ही भारतीय सशस्त्र दलांनी संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित केले. ही पत्रकार परिषद एअर मार्शल ए.के. भारती, लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद आणि मेजर जनरल एस.एस. शारदा यांनी घेतली. यादरम्यान, लष्कराने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, आम्ही जेव्हा हवा तेव्हा आणि जिथे पाहिजे तिथे हल्ला करू शकतो.
भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे देशासमोर येणार आहेत. आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. पण मोदींच्या या भाषणाची सगळ्यात जगात उत्सुकता लागून राहिली आहे.
जयपूर-भरतपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपमध्ये पोलिसांना २०७५ किलो स्फोटके आढळली. पोलिसांनी गाडी जप्त केली. पोलिसांनी जप्त केलेल्या स्फोटकांची माहिती पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (PESO) ला दिली आहे. आता PESO टीम नमुने घेईल. यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान जगासमोर भारताची बाजू मांडणारे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी त्यांचे एक्स अकाउंट खासगी केले आहे. याचा अर्थ असा की केवळ सत्यापित वापरकर्तेच त्यांचे खाते पाहू शकतात किंवा त्यांच्या पोस्टवर टिप्पणी देऊ शकतात.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतावर प्रत्यक्ष हल्ल्यांपेक्षा फेक न्यूजचे हल्ले जास्त केले. पण या पार्श्वभूमीवर भारताने अतिशय उत्तम strategy अंमलात आणून पाकिस्तान वरले हल्ले टप्प्याटप्प्याने उलगडले. त्यासाठी सॅटॅलाइट इमेजेस फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ यांचे स्पष्ट पुरावे सगळ्यात जगासमोर आणले.
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दलाने इस्लामाबाद आणि रावळपिंडी नजीक नूर खान हवाई तळावर अचूक हल्ला करून मारा केल्यानंतर “अचानक” भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली.
मे महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १४,१६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारत-पाकिस्तान तणाव असूनही, एफआयआय भारतीय बाजारात सतत खरेदी करत आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदार पहिल्यांदाच ४,२२३ कोटी रुपयांच्या खरेदीसह निव्वळ खरेदीदार बनले.
भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान इस्लामाबाद नजीक नूर खान एअर बेस जवळ पाकिस्तानच्या atomic installations ला धक्का लावला. त्याच्या आसपासच शनिवारी पाकिस्तान मध्ये दोन भूकंप झाले. रिश्टर स्केलवर त्यांचे मापन 4.00 आणि 5.7 एवढे नोंदविले गेले. आज दुपारी 1.43 वाजता पाकिस्तानला तिसरा भूकंपाचा धक्का बसला. तो रिश्टर स्केलवर 4.3 एवढा नोंदविला गेला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र युनिटचे ऑनलाइन उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले की, आता दहशतवादी सीमेपलीकडेही सुरक्षित नाहीत. आम्ही हे जगाला दाखवून दिले आहे. यावेळी आवाज रावळपिंडीपर्यंत ऐकू गेला.
ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यात पाकिस्तानातल्या नूर खान एअर बेस आणि किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का बसला.
आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने १६ मे पासून सुरू होऊ शकतात. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे ९ मे रोजी आयपीएल २०२५ स्थगित करावी लागली. तेव्हा बीसीसीआयने म्हटले होते की, देश सध्या युद्धाच्या स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे योग्य नाही.
पंजाबच्या मालेरकोटला पोलिसांनी भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही माहिती दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात (राजनयिक दूतावास) तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवली जात होती.
पुण्यातील कर्वेनगर परिसरात वादग्रस्त संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर वाटणाऱ्या काही तरुणांना स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर नंतर, पंतप्रधान मोदींनी सैन्याला आदेश दिला की जर पाकिस्तानकडून एक गोळी झाडली गेली तर येथून एक गोळा झाडली जाईल. सरकारी सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला कडक प्रत्युत्तर देईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App