भारत माझा देश

Wholesale Inflation

Wholesale Inflation : घाऊक महागाई 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; मे महिन्यात 0.39% होती, खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्या

मे महिन्यात घाऊक महागाई दर ०.३९% पर्यंत खाली आला आहे. हा १४ महिन्यांतील सर्वात कमी स्तर आहे. मार्च २०२४ च्या सुरुवातीला घाऊक महागाई दर ०.२६% होता. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे.

UPI Transactions

द फोकस एक्सप्लेनर : UPI व्यवहारात ऐतिहासिक बदल; आता केवळ 15 सेकंदात पेमेंट पूर्ण

१६ जून २०२५ पासून भारतीय डिजिटल पेमेंट प्रणालीत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहार जलद आणि विश्वासार्ह करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल आजपासून लागू केले आहेत. यामुळे आता UPI व्यवहार पूर्वीपेक्षा ५०% जलद होतील. पूर्वी जे पेमेंट पूर्ण होण्यास ३० सेकंद लागत होते, ते आता केवळ १५ सेकंदात पूर्ण होणार आहेत.

इराण – इजरायल संघर्षाचे कारण सांगून ट्रम्प G7 बैठक अर्ध्यावर सोडून कॅनडातून अमेरिकेत, पण मोदींची भेटही टाळली!!

इराण – इजराइल संघर्षाचे कारण सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 ही बैठक अर्ध्यावर टाकून कॅनडातून अमेरिकेत प्रस्थान ठेवले. पण त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणेही टाळले.

Caste census

Caste census : ‘२०२७ च्या जनगणनेत जात जनगणना देखील समाविष्ट केली जाईल’

जात जनगणनेबाबत गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘२०२७ च्या जनगणनेत जात जनगणना देखील समाविष्ट केली जाईल.’

रॉबर्ट वढेरा यांना EDने ‘या’ प्रकरणी चौकशीसाठी बजावले समन्स

सक्तवसुली संचालनालयाने उद्योगपती आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

Ahmedabad plane crash

Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत आता जागतिक विमान वाहतूक तज्ञ सामील

अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) ला मदत करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक तपासनीस आणि बोईंग प्रतिनिधी अहमदाबादला पोहोचले आहेत.

PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसमध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २३ वर्षांत सायप्रसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III प्रदान केले. पंतप्रधान मोदी रविवारी या भूमध्यसागरीय बेट देशात पोहोचले जिथे राष्ट्रपती निकोस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

PM Modi

PM Modi : ‘दहशतवादाविरुद्धच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे, एक नवीन अध्याय लिहिण्याची सुवर्णसंधी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी संयुक्तपणे माध्यमांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सीमापार दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत सायप्रसच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच, दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबद्दलही चिंता व्यक्त केली.

Census

Census : जनगणना दोन टप्प्यात पूर्ण होईल, केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली

केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात असे सांगण्यात आले आहे की जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होईल.

Import export

भारताची निर्यात किती वाढली?, आयात किती घटली?; वाचा नीट आकडेवारी!!

जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती असताना आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीचे हेलकावे खात असताना इतर मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि सकारात्मक आहे, याचे प्रत्यंतर आज समोर आले.

Aamir Khan

Aamir Khan : लव्ह जिहादच्या आरोपांवर आमिर खानचं सडेतोड उत्तर, माझ्या बहिणी आणि मुलीचे हिंदूंसोबत लग्न, प्रेमाला धर्माचं बंधन नसतं

:प्रेमाला धर्माची चौकट घालता येत नाही. दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींमध्ये प्रेम होतं, म्हणजे ते लव्ह जिहादचं नाव घेतलं जावं का? असा सवाल प्रसिद्ध अभिनेते आमिर खान याने केला .’आप की अदालत’ या कार्यक्रमात आमिर खानला लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांबाबत विचारण्यात आलं असता, त्याने स्पष्ट शब्दांत आपली बाजू मांडली.

Kedarnath Helicopter Crash

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर अपघात, 7 जणांचा मृत्यू; चारधाम यात्रा थांबली

रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एका २ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.

Manipur Arms

Manipur Arms : मणिपूरमध्ये 328 शस्त्रे आणि दारूगोळा जप्त; SLR-INSAS सारख्या रायफल्सचा समावेश

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेत, ३२८ शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. यामध्ये सेल्फ लोडिंग रायफल्स (SLR) आणि INSAS सारख्या रायफल्सचा समावेश आहे.

Narendra Modi

Narendra Modi : मोदी सायप्रस दौऱ्यावर; राष्ट्रपती निकोस यांनी विमानतळावर त्यांचे केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रसला पोहोचले आहेत. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी रविवारी विमानतळावर लाल गालिचा अंथरूण त्यांचे स्वागत केले. अध्यक्ष निकोस पंतप्रधान मोदींचा हात धरून चालत गेले.

Indian Air Force

Indian Air Force : भारतीय हवाई दलाला जूनच्या अखेरीस तेजस Mk 1A मिळणार; या वर्षी ताफ्यात 12 जेट लढाऊ विमाने जोडली जातील

ऑपरेशन सिंदूरनंतर काही आठवड्यांनंतर हवाई दलाच्या ताफ्यात एक नवीन विमान सामील होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हवाई दलाला स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान तेजस Mk 1A हे पुढील पिढीचे विमान मिळेल. उड्डाण चाचण्यांची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे लढाऊ विमान ताफ्यात सामील होईल.

Ahmedabad Plane Crash

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद प्लेन क्रॅश- विजय रुपाणींचा DNA जुळला; राजकोटमध्ये अंत्यसंस्कार; आतापर्यंत 31 नमुने जुळले

अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए जुळले आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल आणि राजकोटमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, गंगाराम रुग्णालयात दाखल

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तथापि, नंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

India's border

भारताची सीमा पाकिस्तानच्या आत 150 किलोमीटर पर्यंत खोलवर घुसेल, पुढच्या 5 वर्षांत मोठ्या उलथापालथी; संघ नेते इंद्रेश कुमारांचे भाकित!!

पुढच्या पाच वर्षांमध्ये जागतिक पातळीवर मोठ्या उलथापालथी घडून भारताची सीमा सध्याच्या पाकिस्तानच्या आतमध्ये 150 किलोमीटर पर्यंत खोलवर घुसेल, असे खळबळजनक आणि गंभीर भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी शिमला मधल्या पत्रकार परिषदेत केले. संघाच्या वरिष्ठ नेत्याने एवढे थेट भाकीत केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटलेत.

NIA raids राजस्थान, मध्य प्रदेशातील दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर एनआयएने छापेमारी

हिज्बुत-तहरीर (एचयूटी) या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कबाबत राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) चौकशी तीव्र झाली आहे.

Chirag Paswan

Chirag Paswan : चिराग पासवान बिहार विधासभा निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवणार?

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी एनडीए सोडून एलजेपी (रामविलास) विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

Vijay Rupani

Vijay Rupani : विजय रुपानींचा DNA जुळला; जाणून घ्या, अंतिम संस्कार कधी अन् कुठे होणार?

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची आज रविवार १५ जून रोजी डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली आहे. विजय रुपानी एअर इंडियाच्या AI171 विमानामध्ये होते, जे १२ जून रोजी दुपारी १:३९ वाजता अहमदाबादमध्ये कोसळले होते. या विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. विजय रुपानी यांचाही यामध्ये समावेश आहे. अपघातात बळी पडलेले विमान एअर इंडियाचे बोईंग 787-0 ड्रीमलाइनर होते.

Manoj Sinha

Manoj Sinha अमरनाथ यात्रेपूर्वी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची मोठी घोषणा

उपराज्यपाल सिन्हा यांनी पहलगामबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी १७ जूनपासून काही पर्यटन स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये पहलगाम मार्केटचाही समावेश आहे.

Asaduddin Owaisi

Asaduddin Owaisi : इस्रायल अन् इराणमधील युद्धावर असदुद्दीन ओवैसींची सरकारकडे मोठी मागणी

मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षादरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.

Bachchu Kadu

Bachchu Kadu : बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी; मागण्या पूर्ण न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.

Kedarnath Dham

Kedarnath Dham : केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टर कोसळले; सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती!

उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण होते. या अपघातात सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात