भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक आणि निर्णायक कारवाई करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारताविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. पाकिस्तानने लष्करीदृष्ट्या झालेल्या पराभवाचा बदला शब्दांच्या खेळातून घेण्याचा प्रयत्न केला असून, ब्लूमबर्ग, रॉयटर्स आणि न्यू यॉर्क टाइम्स यांसारख्या डाव्या विचारसरणीच्या माध्यमांनी त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिलं आहे.
operation sindoor दरम्यान अवघ्या चार दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलेच ठोकून काढल्यानंतर सगळ्या भारतात त्याचा आनंद झालेला दिसतोय, पण पाकिस्तानला धुतल्यामुळे इथली लिबरल जमात मात्र दुःखात लोटली गेली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित करून देखील लिबरल जमातीचे दुःख कमी व्हायला तयार नाही, याचेच प्रत्यंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यातून आज आले. मेहबूबा मुफ्ती यांच्या गळ्यातून आज पाकिस्तानी सूर उमटले. सिंधू जल करार स्थगित करून भारत सरकारने चूक केली. ती चूक सरकारने सुधारावी, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देशातील सहाव्या सेमीकंडक्टर युनिटला मंजुरी देण्यात आली आहे. हे युनिट उत्तर प्रदेशातील जेवर येथे ३७०६ कोटी रुपये खर्चून स्थापन केले जाईल.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने तुर्कीविरोधात मोठे पाऊल उचलत सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली आहे.
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी बुधवारी कतारमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यादरम्यान दोघांनीही हस्तांदोलन केले. मुकेश अंबानीही काही वेळ थांबून ट्रम्प यांच्याशी बोलताना दिसले.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये राहुल गांधींसह २० नेत्यांचे आणि १०० अज्ञात समर्थकांचेही नाव आहे. हे गुन्हे दरभंगा जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विनापरवानगी कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे दाखल झाले आहेत.
मध्य प्रदेशातील एका मंत्र्याने कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावरून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या भाषेवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी, उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने मंत्री विजय शाह यांच्याविरुद्धचा एफआयआर केवळ औपचारिकता असल्याचे म्हटले.
पाकिस्तानची दहशतवाद्यांना 14 कोटींची नुकसान भरपाई, बहावलपूर आणि मुरिदके मध्ये terror heavens ची पुन्हा अंडी उबवणी!!, असे घडू लागले आहे. कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीचे पुनरुज्जीवन केले जाते, पण दहशतवादाची मात्र अंडीच उबवली जातात. तेच पाकिस्तानात पुन्हा घडू लागले आहे.
मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहार मंत्री विजय शाह कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री शाह यांच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी गुरुवारी ७ तास बिहारमध्ये राहिले. प्रशासनाची परवानगी न घेता ते दरभंगा येथील वसतिगृहात पोहोचले आणि १२ मिनिटे स्टेजवरून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
Operation sindoor दरम्यान पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लागल्याबरोबर पाकिस्तान भित्र्या कुत्र्यासारखा दोन पायाचे पुढे घालून शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे धावला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी अंतिम मुदती निश्चित करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी विचारले की जर संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही, तर सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांना मंजुरी देण्यासाठी वेळ मर्यादा कशी ठरवू शकते.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले की, पाकिस्तान सीमेपलीकडून होणारा दहशतवाद कायमचा बंद करेपर्यंत सिंधू जल करार स्थगित राहील. होंडुरासच्या दूतावासाच्या उद्घाटनानिमित्त परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानकडे दहशतवाद्यांची यादी आहे, जी त्यांना आम्हाला सोपवावी लागेल.
मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्या तत्काळ हातावेगळ्या करा, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाला दिले. न्यायालयाने या प्रकरणी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना एक नवे खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश दिलेत.
केंद्रामध्ये मोदी सरकारच्या राजकारणाच्या ॲडजस्टमेंट मध्ये राज्यमंत्रीपद टिकवलेल्या रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपदावर बसवून टाकले. यातून त्यांनी शरद पवारांना टोला हाणला, टोमणा मारला की त्यांच्या जखमेवर मीठ चोळले??, हा सवाल तर तयार झालाच, पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार यांच्यासारख्या अतिउपद्रवी आणि अतिउपद्व्यापी राजकारण्याला आपल्या डोक्यावरच्या पदावर बसवून घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे “राजकीय मूढ” आहेत का?
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. सीमेवरील त्याच्या नापाक कारवायांसाठी भारताकडून त्याला इतके योग्य उत्तर मिळाले की त्याने गुडघे टेकले. दरम्यान, पाकिस्तानने अनेक धमक्या दिल्या, तेथील मंत्र्यांनीही अणुहल्ला करण्याबद्दल बोलले
जर पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीचे वर्णन कोणत्याही म्हणीद्वारे केले जाऊ शकते, तर ते म्हणजे- ‘जखमेवर मीठ चोळणे’. पाकिस्तानला अजूनही भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे दुःख जाणवत आहे
पाकिस्तान एखाद्या श्वानाप्रमाणे दोन पायांत शेपूट घालून युद्धविराम करण्यासाठी पळत सुटला. पाकिस्तानी सैन्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हे केले. पाकिस्तानी लष्कर केवळ हरलेच नाही तर ते खूप वाईट रीतीने हरले
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्ष दरम्यान भारताला थेट अणुबॉम्ब युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तान आतून किती पोखरला गेलाय आणि त्याची आर्थिक अवस्था किती भीषण आहे, याचा आलेख एका वेगळ्याच बातमीतून आज समोर आला.
ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि रात्री 11.15 वाजता विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने बुधवारी पाकिस्तानला १.०२ अब्ज डॉलर्स (सुमारे ८,४०० कोटी रुपये) चा दुसरा हप्ता जारी केला. याआधी ९ मे रोजी आयएमएफने पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. हा निधी पाकिस्तानला एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (EFF) कार्यक्रमांतर्गत देण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी काल (१३ मे) पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर होते. येथे ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने ड्रोन, यूएव्ही, लष्करी विमाने आणि क्षेपणास्त्रांनी आमच्या लष्करी तळांना आणि नागरिकांना लक्ष्य केले, परंतु आमच्या हवाई संरक्षण प्रणालीसमोर ते सर्व अपयशी ठरले.’
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने भारतीय निर्मात्यांना तुर्कीएवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. फेडरेशन FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी एक पत्र लिहून सर्व भारतीय चित्रपट निर्मात्यांना तुर्की हे चित्रीकरणाचे ठिकाण निवडण्यापूर्वी विचार करण्याची विनंती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांवर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये पाकिस्तानला तुर्कीचा वाढता पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, पोलिसांनी अखेर बुधवारी रात्री ११ वाजता मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यांच्याविरुद्ध इंदूरच्या मानपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तान हा एक बदमाश देश आहे. त्याने निर्माण केलेली अण्वस्त्रे त्याच्याच हातात “सुरक्षित” नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्रे इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या (IAEA) निगराणी खाली आणा, अशी महत्त्वपूर्ण मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरच्या धरतीवरून केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App