भारतावर अणुबॉम्ब टाकायचा आहे की भारताबरोबर युद्धच नकोय??, या मुद्द्यावर पाकिस्तानी नेत्यांमध्येच गोंधळ झाला आहे
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान हताश झाला आहे आणि तो सतत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे, जो भारतीय सैन्य हाणून पाडत आहे.
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दल आणि लष्कराने सियालकोट चकलाला यांच्यासह सात पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर हल्ले केले. पण पाकिस्तानने ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे दावे केले. ते भारताने फेटाळून लावले.
बुधवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू आणि पठाणकोटसह ११ भागात पाकिस्तानने १०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला, परंतु क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली S400 आणि आकाशने हा हल्ला उधळून लावला.
ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. दोन्ही देशांची तयारी तीव्र झाली आहे. या परिस्थितीत, शाहजहांपूरच्या गंगा एक्सप्रेसवेचे महत्त्व अलिकडे आणखी वाढले आहे. भारतीय हवाई दलाने २ मे रोजी येथे पहिले रात्रीचे लँडिंग करून एक विक्रम प्रस्थापित केला होता. हा केवळ रात्रीच्या लँडिंगसाठीचा सराव नव्हता तर युद्धादरम्यान एक मोठा गेम चेंजर ठरेल.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा याला शुक्रवारी एनआयए रिमांडमधून पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयाने तहव्वुरला ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, राणाला नियोजित तारखेच्या एक दिवस आधी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर राणाला तिहार तुरुंगात नेण्यात आले.
अरुणाचल प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी राज्यात अतिरेकी भरती, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि सीमापार गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उडवले. यात जवळपास 100 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले,
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे आयपीएल २०२५ मध्येच स्थगित करण्यात आले आहे. एका आठवड्यानंतर ते पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. आता २४ मे पासून बंगळुरू येथे होणारी नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत मुख्यमंत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, राफेल बनवणारी कंपनी डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स गेल्या २ आठवड्यात ८% पेक्षा जास्त वाढले आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता पाकिस्तानसोबतच्या तणावावर परराष्ट्र मंत्रालयाने सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली.
इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम आता पुढे ढकलण्यात आला आहे. आयपीएल २०२५ अंतर्गत होणारे उर्वरित सामने सध्या खेळवले जाणार नाहीत. धर्मशाळा येथे होणारा पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना काल रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत, आता भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आयपीएल २०२५ स्थगित करण्यात आले आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर, बोर्ड पुन्हा या स्पर्धेच्या भविष्याबद्दल निर्णय घेऊ शकते.
ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यापासून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत आज तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची ढाल अशी सगळी पापे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी वाचली.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असल्याचे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, ही विधाने स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले होते.
भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू करताच पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी दहशतवादाविरुद्ध राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला आहे आणि भारत सरकार आणि सशस्त्र दलांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे अभिनंदन केले आहे.
“ऑपरेशन सिंदूर” मध्ये भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती वाटली म्हणूनच ते पाकिस्तानला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवायला समोर आल्याचे चित्र आज दिसून आले.
पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान, केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशवासीयांना अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. देशात सर्व आवश्यक अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचा मुबलक साठा आहे,
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. आता भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईवर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विशेषतः संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेसह अनेक देशांतील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या कोणत्याही प्रक्षोभक प्रयत्नांना ठामपणे तोंड देण्याच्या भारताच्या दृढनिश्चयावर भर दिला.
भारताने यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला तोंड देताना पाकिस्तानचे प्रत्यक्ष नाकी नऊ आलेत. कारण त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाली.
जम्मू आणि काश्मीरसह भारतातील काही राज्यांवर पाकिस्तानने हल्ला केला. हे हल्ले भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान आणि दोन जेएफ १७ विमान पाडले. यासोबतच जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ड्रोन हल्लेही हाणून पाडले.
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. बुधवारप्रमाणे, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग होत्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App