केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांसाठी फेब्रुवारी महिन्यात “दिवाळी” आणली. देशाच्या अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गीयांचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्यांच्या योगदानाला अधिमान्यता देताना सीतारामन यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे मध्यमवर्गीयांना 12 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत कोणताही इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही.
– शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, क्रेडिट कार्ड लिमिट 3 लाखांहून 5 लाखांवर; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा
पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे. नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही. नवीन बिल म्हणजे आयकराच्या पद्धतीत बदल असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला 8 वा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे शेतकरी युवक महिला आणि उद्योजक यांच्यासाठी विविध योजना जाहीर केल्या त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी योजनांवर विशेष भर ठेवला. त्यांनी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. यानुसार, आर्थिक वर्ष 26 मध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत जीडीपी वाढ 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, 2024 च्या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5.4% होती, जी एप्रिल-डिसेंबर 2024 मध्ये 4.9% झाली.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अमेरिकन राष्ट्रवादी’ असे वर्णन केले आहे आणि म्हटले आहे की त्यांची काही धोरणे भारतासाठी आउट ऑफ सिलॅबस असू शकतात.
शुक्रवारी 18व्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात ५९ मिनिटांचे भाषण केले. त्यांच्या भाषणावर काँग्रेस नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे वाद निर्माण झाला. सोनिया गांधींनी द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी ‘बेचारी’ हा शब्द वापरला. तर राहुल यांनी भाषण कंटाळवाणे म्हटले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 5 दिवस आधी आम आदमी पक्षाच्या 7 विद्यमान आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये मेहरौली, त्रिलोकपुरी, जनकपुरी, बिजवासन, पालम, आदर्श नगर, कस्तुरबा नगर विधानसभा जागांचा समावेश आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्वारका येथे एक सभा घेतली. ते म्हणाले की, देशाने पुन्हा एकदा काँग्रेसच्या राजघराण्याचा अहंकार पाहिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत भाषण केले.
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, राणाच्या प्रत्यार्पणाबाबत अमेरिकन एजन्सीशी चर्चा सुरू आहे.
एक देश, एक निवडणूक या दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची (JPC) दुसरी बैठक शुक्रवारी (31 जानेवारी) झाली. समितीने विधेयकावर सूचना घेण्यासाठी भागधारकांची यादी तयार केली. यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश, निवडणूक आयोग, राजकीय पक्ष आणि राज्य सरकारे यांचा समावेश आहे
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आज म्हणजेच शुक्रवारी न्यायालयात हजर झाल्या.
बजेट 2025 कडून CII ची अपेक्षा, ग्रामीण भागात वाढवा नोकऱ्या!! अशा स्पष्ट शब्दात कन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्थात (CII) चे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व राजकीय पक्ष व्यस्त असताना, दिल्लीतील सत्ताधारी पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. नरेश यादव यांनीही सोशल मीडियावर राजीनामा पत्र शेअर केले आहे.
मंदिरांमध्ये व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क आकारणे आणि विशिष्ट वर्गाच्या लोकांना प्राधान्य देणे याविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हा आमच्या अधिकारक्षेत्रातील विषय नाही. हा मुद्दा मंदिर व्यवस्थापन आणि समाजाच्या निर्णयाशी संबंधित आहे
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे दिल्लीस्थित घर असलेल्या कपूरथला हाऊसमध्ये शोध घेण्यासाठी पोहोचले. कपूरथला हाऊसबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध कामांवर चर्चा केली
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की ट्रम्प यांची काही धोरणे भारताच्या अभ्यासक्रमाबाहेर असू शकतात. पण आपण आपल्या राष्ट्रीय हिताला महत्त्व देऊ
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी शुक्रवारी रोहतकमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले. यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याच्या आरोपांना उत्तर देताना, मुख्यमंत्री नायब सैनी यांनी अरविंद केजरीवाल यांना आव्हान दिले आणि सांगितले की त्यांनी प्रयोगशाळेत यमुनेच्या हरियाणा आणि दिल्ली भागातील पाण्याची चाचणी करून घ्यावी. केजरीवाल यांनी आपले अपयश लपवण्यासाठी हा आरोप केला आहे.
स्वीडनमधील मशिदीसमोर कुराण जाळणाऱ्या आंदोलक सलवान मोमिका यांची बुधवारी संध्याकाळी अज्ञातांनी हत्या केली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, स्टॉकहोममधील सॉडरटेलजे येथील एका अपार्टमेंटमध्ये 38 वर्षीय सलवानवर गोळ्या झाडण्यात आल्या. हत्येच्या वेळी सलवान टिकटॉकवर लाइव्ह होता.
संसदेत अभिभाषण करताना राष्ट्रपती थकल्या. “पूअर लेडी” असे म्हणून सोनिया गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला. त्यावरून देशात मोठा गदारोळ उठला. काँग्रेस सोडून बाकीच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सोनिया गांधींना त्याबद्दल धारेवर धरले. काँग्रेस पक्षाने राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका करत सोनिया गांधींनी केलेल्या अपमानाच्या विषयावर स्वतंत्र प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रपती भवनातून देखील राष्ट्रपती थकल्या नसल्याचा स्पष्ट खुलासा केला गेला.
देशाच्या आर्थिक सर्वेक्षणातून दाखविले विकसित भारताचे स्वप्न, पण मांडले वास्तवाचे देखील चित्र!!, असेच 2025 च्या आर्थिक सर्वेक्षणाचे वर्णन करावे लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण काही क्षेत्रातली आकडेवारी चिंताजनक नसली, तरी गंभीर इशारा देणारी निश्चित आहे. किंबहुना तो इशारा लक्षात घेऊन आधीपासूनच काळजीपूर्वक उपाययोजना केल्या पाहिजेत, हे सांगणारी आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2025 रोजी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी सटीक भाष्य करण्यात आले असून त्यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (GDP) वाढ 2025 मध्ये सर्वांत आस्ते कदम राहणार असल्याचे सूचित केले आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. १८ व्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले की, माझ्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले पूर्ण बजेट आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक नवा आत्मविश्वास निर्माण करेल आणि नवी ऊर्जा देईल.PM Modi
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचा मुलगा ॲलेक्स सोरोस यांची भेट घेतली आहे. ढाका येथील ओपन सोसायटी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली. युनूस गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ॲलेक्सला भेटले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App