ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यात पाकिस्तानातल्या नूर खान एअर बेस आणि किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का बसला.
आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने १६ मे पासून सुरू होऊ शकतात. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे ९ मे रोजी आयपीएल २०२५ स्थगित करावी लागली. तेव्हा बीसीसीआयने म्हटले होते की, देश सध्या युद्धाच्या स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे योग्य नाही.
पंजाबच्या मालेरकोटला पोलिसांनी भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही माहिती दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात (राजनयिक दूतावास) तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवली जात होती.
पुण्यातील कर्वेनगर परिसरात वादग्रस्त संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर वाटणाऱ्या काही तरुणांना स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर नंतर, पंतप्रधान मोदींनी सैन्याला आदेश दिला की जर पाकिस्तानकडून एक गोळी झाडली गेली तर येथून एक गोळा झाडली जाईल. सरकारी सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला कडक प्रत्युत्तर देईल.
पाकिस्तानच्या सीमेवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे, परंतु भारताचे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. रविवारी तिन्ही सैन्याच्या डीजी ऑपरेशन्सनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, लष्कराने ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली आणि सांगितले की आम्ही आमचे लक्ष्य आणि उद्दिष्ट पूर्ण केले आहे आणि पहलगाममधील पीडितांना न्याय मिळाला आहे.
मणिपूरमधील भाजपचे एकमेव राज्यसभा सदस्य महाराजा सनाजाओबा लेशेम्बा यांनी रविवारी आशा व्यक्त केली की पुढील दोन महिन्यांत राज्यात एक लोकप्रिय सरकार स्थापन होईल. तसेच, राज्यसभा सदस्याने सर्व राजकीय नेत्यांना राज्यासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ही युद्धबंदी लागू झाली. युद्धबंदीनंतरही पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे भारतात तीव्र संताप निर्माण झाला आहे, असे भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय नौदलाने केवळ तयारी दाखवली नाही तर भारतीय सागरी सीमांची सुरक्षा सुनिश्चित करून आपल्या दलांना पूर्णपणे युद्धासाठी सज्ज केले.
आपण अजूनही हवाई युद्धाच्या परिस्थितीत आहोत, असंही सांगण्यात आलं आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर इंदिरा गांधींची आठवण करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोचले, पण त्याच वेळी काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि पी. चिदंबरम यांनी मात्र मोदींच्या निर्णयाची वाखाणणी केली. त्यामुळे काँग्रेस मधली दुफळी समोर आली.
दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच ऑपरेशन सिंदूरचे सगळ्यात मोठे यश ठरले!! भारतीय सैन्य दलांनी precision and professional attack करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या लष्करी पोशिंद्यांचे असे काही कंबरडे मोडले
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नव्हता, असा स्पष्ट खुलासा भारतीय सूत्रांनी आज केला.
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, चंदीगड, राजस्थान आणि वायव्य गुजरातच्या सीमावर्ती भागात असलेल्या तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, श्रीनगर आणि लेहमधील महत्त्वाच्या आयएमडी प्रतिष्ठानांची सुरक्षा देखील वाढवली जाईल.
पाकिस्तानने पुन्हा एकदा आपले नापाक कृत्य केले आहे. युद्धबंदीच्या काही तासांनंतरच, त्यांनी या कराराचे उल्लंघन केले. या सगळ्यामध्ये आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान चीनचा खरा चेहराही समोर आला आहे. या परिस्थितीत चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावादरम्यान, चीनने पुन्हा एकदा आपल्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे आणि पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
ऑपरेशन सिंदूर मध्ये 7 ते 10 मे 2025 या चार दिवसांमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानात केलेल्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले त्याचबरोबर पाकिस्तानचे 35 ते 40 सैन्याचे अधिकारी आणि सैनिक मारले गेले, अशी माहिती भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आत्तापर्यंत भारताने फक्त 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती अधिकृतपणे दिली होती. परंतु आज लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याची बातमी दिली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखे वातावरण आहे. तथापि, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली. दरम्यान, भारतीय हवाई दलाने सांगितले आहे, की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. एअर फोर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली??, ती कुणी केली??, याच्या बातम्या देताना अमेरिकन प्रेस विशेषत: न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN यांनी भारत विरोधी नॅरेटिव्ह पसरवले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुबॉम्बचे युद्ध भडकण्याची शक्यता किंबहुना “गुप्त माहिती” अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. पाकिस्तानी लष्करामधल्या कट्टरतावादी शक्ती एकतर भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरतील किंवा पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडतील, असे जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याच्या बातम्या CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी गुप्ताचरांच्या हवाल्याने दिल्या. यातून भारत घाबरल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे नेहमीप्रमाणे सूचित केले. पण पाकिस्तानशी फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत करण्याविषयी बोला, असे मोदींनी जे. डी. व्हान्स यांना सुनावले, याची बातमी मात्र न्यूयॉर्क टाइम्स किंवा CNN यांनी चालविली नाही.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर अखेर शनिवारी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेला एक स्तंभ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनीत्यांच्या लेखात पंतप्रधान मोदींचे कौतुक केले
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादाबाबत जगाचे दुटप्पी निकष उघड केले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसदृश परिस्थितीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून पाकिस्तानला मिळालेल्या कर्जावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की अशाप्रकारे तणाव कसा कमी करता येईल?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानची हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली HQ-9 नष्ट करण्यात आली आहे. ते म्हणाले की भारतीय सैन्याने अकल्पनीय काम केले आहे, ज्यासाठी ते त्यांचे मनापासून अभिनंदन करतात.
जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या संदर्भात राज्य तपास संस्था (SIA) छापे टाकत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या छाप्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
“ऑपरेशन सिंदूर” मधून भारताने पाकिस्तानच्या लष्करी आणि हवाई दल तळांना प्रचंड नुकसान पोहोचविले असताना, ज्यावेळी अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या बचावासाठी वेगवेगळ्या मार्गांनी उतरले, नेमके त्याच वेळी काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी मोदी सरकारला घेरायचे ठरविले. हे चित्र आज 11 मे 2025 रोजी समोर आले.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात इस्रोने महत्त्वाची भूमिका बजावली. इस्रोच्या उपग्रह नेटवर्कमधील माहितीच्या मदतीने, भारतीय सैन्याने लष्करी रडार प्रणाली नष्ट करण्यात आणि पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात यश मिळवले.
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने पुरता धडा शिकवला. त्यानंतरच पाकिस्तानला शस्त्रसंधी करावीशी वाटली म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली. भारतीय हवाई दलाने operation sindoor सध्या थांबविले नसल्याचेच जाहीर केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App