भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले नाहीत, तर पाकिस्तानने ताब्यातघेतलेल्या भारतीय जवानाची सुटका करण्यास भाग पाडले.
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई (बीआर गवई) यांनी आज (बुधवार, १४ मे) रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश (सीजेआय) म्हणून शपथ घेतली. ते देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश ठरले आहेत. त्यांच्या आधी, न्यायमूर्ती केजी बालकृष्णन हे भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश होते. २००७ मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कडक राजनैतिक निर्णय घेतला आहे. दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला ‘persona non grata’ घोषित करत २४ तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याने आपल्या अधिकृत जबाबदारीच्या चौकटीबाहेर जाऊन अशा कृती केल्या असल्याचा आरोप भारताने केला असून, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर पावलं उचलण्यात आली आहेत.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मान्सून मंगळवारी निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचला.
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी निवृत्तीनंतर कोणतेही अधिकृत पद भूषवणार नाही, परंतु कायद्याच्या क्षेत्रात त्यांचे काम सुरू ठेवतील असे म्हटले आहे. १८ जानेवारी २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात बढती मिळालेले न्यायमूर्ती खन्ना यांची ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. मंगळवार हा सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता
भारताने “ऑपरेशन सिंदूर” मधून काय मिळवले??, असा “अतिउच्चशिक्षित बौद्धिक” प्रश्न करण थापरने विचारला
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे ते हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना भेटले. यानंतर त्यांनी २८ मिनिटे सैनिकांना संबोधित केले.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडेच झालेल्या युद्धबंदी करारानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) नवी दिल्ली येथे होणार आहे.
जम्मू-काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारार्ह नाही, असे भारताने मंगळवारी म्हटले आहे. भारत-पाकिस्तान हे प्रश्न आपापसात सोडवतील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, पाकिस्तानला पीओके रिकामा करावे लागेल. सर्व प्रकरणे द्विपक्षीय पद्धतीने सोडवली जातील.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातच द्विपक्षीय पद्धतीने सोडवला जाईल, त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही. मंगळवारी पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर (पीओके) रिकामा करावे लागेल. त्यांनी पुनरुच्चार केला की हे भारताचे बऱ्याच काळापासूनचे धोरण आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.
आज पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान सीमेजवळील आदमपूर एअरबेसला भेट दिली. हा तोच आदमपूर एअरबेस आहे, जो पाकिस्तानने चिनी सॅटेलाइट इमेजद्वारे नष्ट केल्याचा खोटा दावा केला होता. आदमपूर एअरबेसला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सीमेवरून पाकिस्तान आणि चीनला काय इशारा दिला, या भेटीद्वारे भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण जगाला कसे दाखवले गेले, ते आजच्या द फोकस एक्सप्लेनरद्वारे जाणून घेऊया.
मराठ्यांनी सिंधू नदी जिंकली, चिनाब, रावी, झेलम पार केली, अटक किल्ला जिंकून घेतला. अटकेपार झेंडे लावले, त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत लढाई नेऊन ठेवली.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया साइट X वर माहिती दिली आहे, की त्यांची मुलगी अदिती यादव हिच्या नावाने एक बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. अखिलेश म्हणाले आहेत की आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. अखिलेश म्हणाले की, हे माझ्याकडून एफआयआरपेक्षा कमी समजू नये.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची नेत्रदीपक वाढ सुरूच आहे. मंगळवारी रुपया ७५ पैशांच्या वाढीसह ८४.६५ वर आला. तर मागील सत्रात, डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.३८ वर बंद झाला होता.
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. त्याचे credit अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडे ओढून घेतले. अमेरिकेने व्यापाराची लालूच दाखवून भारत आणि पाकिस्तान यांच्यातले अणुयुद्ध टाळले, असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात “मध्यस्थी” करायची “ऑफर” दिली. या दोन्ही बाबी भारताने आज ठामपणे फेटाळून लावल्या
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेनंतर आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या रूपात भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ६-७ मे च्या रात्री पाकिस्तानवर प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास शत्रूचा सर्वनाश करणार, आमच्या वेळेनुसार, आमच्या स्टाईलने उत्तर देणार. पाकिस्तानला आत मध्ये घुसून मारणार बचावाची एकही संधी नाही देणार, अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
कर्नाटक पोलिसांनी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांच्या गूढ परिस्थितीत मृत्यूचा तपास सुरू केला आहे. शनिवारी श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत ते मृतावस्थेत आढळले. ७० वर्षीय अयप्पन हे कृषी आणि मत्स्यव्यवसाय शास्त्रज्ञ होते आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICMR) अध्यक्ष असलेले पहिले बिगर-पीक शास्त्रज्ञ होते.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ पर्यटकांची निर्घृण हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. शोपियान जिल्ह्यातील विविध भागात दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
युट्यूबर एल्विश यादवला अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज आणि सापाच्या विषाच्या वापराच्या प्रकरणात आरोपपत्र-समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सोमवारी न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.
“ऑपरेशन सिंदूर” प्रत्यक्ष सुरू असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अचानक शस्त्रसंधी झाली.
शनिवारी रात्री पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यानंतर, लष्कराचे डीजीएमओ म्हणजेच लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती देखील उपस्थित होते.
कर्नाटक काँग्रेसने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवणारा नकाशा होता. कन्नड भाषेत लिहिलेल्या या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी आणि सरकारवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून पाकिस्तानला दिले जाणारे कर्ज रोखण्यात अपयश आल्याबद्दल टीका करण्यात आली आहे. तथापि, ही पोस्ट आता X मधून काढून टाकण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी पंजाब मधल्या होशियारपूर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या आदमपूर हवाई तळाला भेट दिली. तिथल्या बहादूर जवानांची संवाद साधत त्यांच्याविषयी संपूर्ण देशाची कृतज्ञता व्यक्त केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App