सिंगापूरच्या एका न्यायालयाने एका भारतीय पर्यटकाला स्विमिंग कॉम्प्लेक्समध्ये १२ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याबद्दल आणि तिला इंस्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवल्याबद्दल दोषी ठरवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रमेंदर (२५) नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भारत युएई, इराण आणि इतर आखाती देशांमधून येणाऱ्या सर्व शिपमेंटची कसून तपासणी करत आहे. याद्वारे सरकार पाकिस्तानमधून येणारा कोणताही माल कोणत्याही मार्गाने भारतात पोहोचू नये याची खात्री करू इच्छिते. सरकार ट्रान्सशिपमेंट हबमधून येणाऱ्या वस्तूंची देखील तपासणी करत आहे.
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाने ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये काही मेसेज पकडले गेले, त्यामुळे youtuber ज्योती मल्होत्र आणि अन्य सहा जणांचे पाकिस्तानातले हेरगिरीचे चाळे उघड्यावर आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले की, भारत कोणाशीही वैरभाव ठेवत नाही, परंतु जर कोणी काही करण्याचे धाडस केले तर तो त्याला धडा शिकवण्यापासून मागे हटणार नाही.
पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला.
सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश बीआर गवई यांनी शनिवारी म्हटले की, न्यायाधीश जमिनीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) च्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी, सरन्यायाधीश गवई यांनी सामाजिक वास्तव समजून घेण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात न्यायाधीशांच्या भूमिकेवर भर दिला.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा शनिवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते शनिवारी गांधीनगरला पोहोचले, जिथे त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की- मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून तीन हल्ले झाले आहेत आणि मोदीजींनी तिन्ही दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. उरी सर्जिकल स्ट्राईकने उद्ध्वस्त केले, पुलवामा एअर स्ट्राईकने उद्ध्वस्त केले आणि आता ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानी मुख्यालय उद्ध्वस्त केले.
Operation sindoor च्या सैन्य कारवाईत आणि सिंधू जल कराराच्या स्थगितीनंतर पाकिस्तानचे हात, पाय, डोके आणि अन्य सर्व अवयव आवळल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी वेगवेगळे हातखंडे आजमावायला सुरुवात केली आहे.
इस्रायली सैन्याने हमासला पराभूत करण्यासाठी आणि त्यांच्या ओलिसांना सोडण्यासाठी गाझामध्ये एक मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत, इस्रायलने गेल्या ३ दिवसांत गाझावर अनेक मोठे हल्ले केले आहेत, ज्यामध्ये २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मध्य अमेरिकेत आलेल्या एका भीषण वादळामुळे शनिवारी मिसूरी आणि आग्नेय केंटकीमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
‘छोटी सरदारनी’ या टीव्ही शोमध्ये दिसलेली अभिनेत्री निमरत कौर अहलुवालियाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की जेव्हा ती १९ वर्षांची होती आणि कायद्याचे शिक्षण घेत होती आणि तिच्या इंटर्नशिप दरम्यान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेली होती, तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिल्ली महानगरपालिकेतील (एमसीडी) १५ आप नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंद्रप्रस्थ विकास पक्ष नावाच्या तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याची घोषणाही केली आहे. मुकेश गोयल हे नवीन आघाडीचे नेतृत्व करतील.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांची राज्य तपास संस्था (SIA) मध्य आणि उत्तर काश्मीरमधील सोपोर, बारामुल्ला, हंदवाडा, गंदरबल आणि श्रीनगरसह अनेक भागात छापे टाकत आहे. दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे.
हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना ५ दिवसांची रिमांड मिळाली.
पीएनबी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी फरार नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. लंडनमधील किंग्ज बेंच डिव्हिजन हायकोर्टाने सुनावणीनंतर तो फेटाळला. भारताच्या वतीने सीबीआयच्या वकिलाने नीरवच्या युक्तिवादांना विरोध केला होता.
भारतीय फौजांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारताने पाकिस्तान वरची सैन्य कारवाई सध्या थांबवली. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मवलावी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. अफगाणिस्तानात तालिबान सरकारच्या पुनर्स्थापनेनंतर भारत आणि अफगाण तालिबान सरकारमधील ही पहिलीच मंत्रीस्तरीय चर्चा होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल जयशंकर यांनी मुत्ताकी यांचे आभार मानले.
ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार संरक्षण बजेटमध्ये आणखी वाढ करू शकते. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.यानुसार, संरक्षण मंत्रालयाने सरकारला अतिरिक्त ५०,००० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे, जो संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकतो.
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गमावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी शिक्षकांनी शिक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या ‘विकास भवन’ बाहेरील बॅरिकेड्स तोडले आणि घोषणाबाजी करत निषेध सुरू केला.
operation Sindoor मध्ये भारताने प्रचंड यश मिळवल्यानंतर पाकिस्तान सकट अन्य काही घटकांना ते यश रुचले नाही त्यामध्ये जसा बाहेरच्या देशांमधल्या घटकांचा समावेश आहे
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, त्यांनी सांगितले की पाकिस्तान शांततेसाठी भारताशी चर्चा करण्यास तयार आहे परंतु त्यात काश्मीर मुद्दा समाविष्ट असला पाहिजे.
7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधून खासदारांची परदेशांमध्ये पाठवणी आणि कपिल सिब्बलांची (स्व)पाठ थोपटणी, असे राजकीय चित्र आज समोर आले.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, भाजपशी स्पर्धा करण्यासाठी इंडिया आघाडी आवश्यक आहे, म्हणूनच काँग्रेसने काही जागांवर तडजोड केली.त्यांनी गुरुवारी सांगितले की, ‘आम्ही आघाडी केली आणि आमची जागाही सोडली. पण आता ही आघाडी अधिक मजबूत आणि चांगली करण्याची गरज आहे. इतर पक्षांनाही एकत्र काम करावे लागेल.
रोहिंग्या निर्वासितांना भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय समुद्रात फेकल्याचा खळबळजनक आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. एन. कोटिस्वर सिंग यांच्या खंडपीठाने याचिकेतील घटनांचे वर्णन “खूपच सुंदरपणे लिहिलेली गोष्ट” असे म्हणत याबाबत काडीचाही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान वर diplomatic strike करण्यासाठी मोदी सरकारने वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App