पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात फ्रान्सला भेट देणार आहेत. जिथे ते ११ फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या एआय समिट २०२५ चे सह-अध्यक्षपद भूषवतील. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, चीनचे उपपंतप्रधान आणि इतर अनेक जण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी या काळात अनेक फ्रेंच कंपन्यांच्या प्रमुखांना भेटतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील.
प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरीच्या प्रकरणाचा तपास आता कटाकडे वळत आहे. उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारच्या एजन्सी याचा तपास अपघात नसून कट म्हणून करत आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM वर आरोपांच्या बंदुकांच्या फैरी झाडणार्या विरोधकांनी आता त्या मशीन वरची बंदूक हटवली आणि ती मतदार यादी कडे वळवली.
अमेरिकेने मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांचे डिपोर्टेशन केल्यानंतर त्यांचे पुढे काय होईल? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. भारतात काही खटला चालेल का? ते पुन्हा अमेरिकेला जाऊ शकतील का? याची पोलिस चौकशी होईल का? म्हणूनच आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया अशाच काही प्रश्नांची उत्तरे.
आंध्र प्रदेश भाजपने गुरुवारी आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) मधील 1,000 बिगर-हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी केली. आंध्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते आणि टीटीडी सदस्य भानू प्रकाश रेड्डी म्हणाले की, बोर्डाचे प्रतिनिधी 14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतील आणि त्यांना मंदिरातील सेवांमधून बिगर-हिंदूंना काढून टाकण्याची विनंती करतील.
अमेरिकेतून येणाऱ्या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी संसदेत उत्तर दिले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘जर कोणताही नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असेल तर त्याला परत बोलावणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे.’
दिल्लीचे एक्झिट पोल खोटे ठरण्याची आशा; अरविंद केजरीवालांनी घेतला सगळ्या 70 उमेदवारांचा मेळावा!!, असे आज दिल्लीत घडले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे उद्या निकाल आहेत, या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा ठरला.
चीनच्या ताब्यात असणाऱ्या तिबेटमधील भागात कैलास मानसरोवर यात्रेची तयारी सुरू झाली आहे. २०१९ पासून ही यात्रा बंद होती. यात्रेसाठी भारतीयांचा पहिला जथ्था जूनच्या पहिल्या आठवड्यात रवाना होऊ शकतो.
डिस्कव्हरीने लोकांना दाखवलेल्या आसारामच्या ‘कल्ट ऑफ फिअर’ची कहाणी खुद्द कर्मचारीच अनुभवत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्कव्हरी प्लसचे कर्मचारी आसाराम समर्थकांच्या दहशतीमुळे भीतीखाली वावरत आहेत. भीतीदेखील अशी की १०० हून अधिक कर्मचारी कार्यालयात येत नाहीत आणि ते त्यांच्या घरातच बंदिस्त आहेत.
प्रयागराज मध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्याची पॉप्युलरिटी सगळ्यात जगभरात पोहोचल्यानंतर तिथल्या व्यवस्थेची देखील सगळीकडे वाखाणणी झाली.
भारतीय सैन्याची अग्निशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने ‘पिनाका मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम’ साठी एरिया डिनायल ऑर्डनन्स टाइप-१ आणि हाय एक्सप्लोसिव्ह कॅपॅबिलिटी रॉकेट्स खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी संरक्षण कंपन्यांसोबत १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे करार केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे की भारत २०२७ मध्ये चंद्रयान-४ मोहीम सुरू करेल ज्याचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावरून खडकांचे नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर आणणे आहे.
दिल्लीत राजकारण तापत असताना, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला आहे की भाजप त्यांच्या उमेदवारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आतापर्यंत भाजपने त्यांच्या १६ उमेदवारांना बोलावले आहे. त्यांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता, मंदिर दररोज सुमारे 16 तास खुले राहील. शृंगार आरतीनंतर, मंदिराचे दरवाजे सकाळी 6 वाजता भाविकांसाठी उघडतील. रात्री 10 वाजेपर्यंत रामलल्ला दर्शन देतील.
निवडणूक निकालांपूर्वी, आम आदमी पार्टी खासदार संजय सिंह यांनी आरोप केला की भाजपने दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले आहे. भाजपने ८ फेब्रुवारीपूर्वी पराभव स्वीकारला आहे. भाजपने आमचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. काही गोष्टींमध्ये ते यशस्वी झाले. ते पैसे आणि तपास संस्थांचा वापर करतात. आमचे दोन मंत्री दिल्लीत तुटले. आम्ही खूप संघर्ष करून दिल्ली वाचवली.
महाकुंभात धर्म संसद सुरू आहे. यामध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले – धार्मिक शिक्षण हा आपल्या मुलांचा मूलभूत अधिकार आहे. गरज पडल्यास संविधानात सुधारणा करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा सबका साथ, सबका विकास या त्यांच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापन त्यांच्या 18 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) च्या नियमांविरुद्ध काम केल्याबद्दल या सर्वांना दोषी ठरवण्यात आले आहे.
अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन सुरू झाल्याबरोबर त्यांनी अमेरिकेतल्या बेकायदा घुसखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली. त्यांनी अनेक देशांमधले अमेरिकेत राहणारे बेकायदा नागरिक हाकलून दिले.
भारताच्या अर्थ मंत्रालयाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही कार्यालयीन कामासाठी ChatGPT आणि DeepSeek सारख्या AI साधनांचा वापर टाळण्यास सांगितले आहे. सरकारचा असा विश्वास आहे की अशा AI टूल्समुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण होतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी बुधवारी सांगितले की, देशात पाश्चात्य उदारमतवादी विचारांचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे वाढत आहे. यामुळे देशाच्या सांस्कृतिक अस्मितेला धोका निर्माण होत आहे. त्यांनी लोकांना जागरूक राहण्याचे आणि हा धोका थांबवण्याचे आवाहन केले.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुल इस्लामला पोलिसांनी नुकतेच अटक केली. बुधवारी आर्थर रोड तुरुंगात शरीफुल इस्लामची ओळख परेड काढण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरीफुल इस्लामची ओळख पटवण्यासाठी सैफची स्टाफ नर्स अरियामा फिलिप आणि आया जुनू देखील परेड दरम्यान उपस्थित होत्या.
पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीरबाबत जुनाच सूर लावला आहे. “काश्मीर एकता दिना” निमित्त मुझफ्फराबाद येथे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, भारताने संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. यासाठी संभाषण सुरू केले पाहिजे. ‘
पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०२९ पूर्वीच विरोधी बाकांवर बसवायची काँग्रेसने “स्वप्न भरारी” घेतली, पण काँग्रेसलाच Indi आघाडीच्या नेतृत्व पदावरून हाकलायची मित्र पक्षांनी तयारी केली.
महाराष्ट्रातील नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेटिंग अॅपवर फसवणूक करून ३३ लाख रुपये लुटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App