गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत न्यायमूर्ती वर्मा यांनी रोख घोटाळ्याबाबत त्यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाईला आव्हान दिले होते.
राहुल गांधींना महादेवपुरा मतदारसंघातली दिसली “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!, असेच राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर उघड झाले.
स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे मराठी नेते दिल्लीश्वरांसमोर झुकले; तिसऱ्या – चौथ्या रांगेत जाऊन बसले!!, हे राजकीय वास्तव चित्र काल राहुल गांधींच्या निवासस्थानी अधोरेखित झाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मतदार यादीतील अनियमिततेवर १ तास ११ मिनिटे २२ पानांचे सादरीकरण दिले. राहुल गांधी यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि सांगितले की, मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील इंदिरा भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात ‘मतचोरी’ केल्याचा आरोप केला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर संतापून 50 % टेरिफ लादला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे नाव न घेता भारतीय शेतकऱ्यांचे हित जपणारच, असे सांगून परखड प्रत्युत्तर दिले म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपले
खालिद का शिवाजी’ शिवाजी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील काही संवादांवरून अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाचा तीव्र विरोध केला जात आहे. चित्रपटाला वाढता विरोध पाहता, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक पत्रक जाहीर करून वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. “सिनेमाच्या आशयामुळे कोणाच्या भावना दुखावाव्यात, असा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे संबंधित दृश्ये आणि संवाद पुन्हा एकदा तपासले जात असून, आक्षेपार्ह भाग हटवला जाणार आहे.” असे निर्मात्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील कर्तव्य पथावरील कर्तव्य भवन-०३ इमारतीचे उद्घाटन केले. पंतप्रधान म्हणाले – विकसित भारताची धोरणे कर्तव्य भवनात बनवली जातील. ही केवळ एक इमारत नाही, तर कोट्यवधी लोकांची स्वप्ने सत्यात उतरवण्याची ती भूमी आहे.
7 फुटांपर्यंत उंची चढलेला कागदपत्रांचा ढिग दाखवून राहुल गांधींनी केले आरोप; पण निवडणूक आयोगाने मागितले फक्त त्यांच्या सहीचे प्रतिज्ञापत्र!!, अशी राजकीय खेळी आज देशात घडली.
बीसीसीआय अजूनही आरआयटीच्या कक्षेत येणार नाही. क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकात सुधारणा केली आहे. त्यानुसार, आता फक्त त्या क्रीडा संघटनांनाच त्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे, ज्या सरकारी अनुदान आणि मदत घेतात.
पृथ्वीराज बाबांनी सवाल केला, “स्वस्त” रशियन तेलाचा कुणाला फायदा??, जयशंकरांनी दाखविला UPA ला आरसा!!, असे आज राजधानीत घडले.
एअर इंडिया १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करेल. सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, १ ऑगस्टपासून काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत आणि १ ऑक्टोबरपर्यंत सर्व उड्डाणे सुरू करण्याचे लक्ष्य आहे. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर काही उड्डाणे अंशतः थांबवण्यात आली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी मुरादाबादमध्ये ७९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल निवासी शाळेचे उद्घाटन करताना विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, तुष्टीकरणाचे राजकारण करून सत्तेत आलेले लोक आज इथे नाहीत आणि तिथेही नाहीत. असे लोक समाजासोबत किंवा भावी पिढीसोबत उभे राहू शकत नाहीत. मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपच्या योजना तुष्टीकरणावर आधारित नाहीत, तर संतुष्टीकरणावर आधारित आहेत. ज्या कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतात.
भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानातल्या नूर खान हवाई तळावर आणि किराणा हिल्स वर केलेल्या हल्ल्याची खुन्नस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढली.
किंमत मोजावी लागली तरी भारत झुकणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात कारणावरून ठणकावून सांगितले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज 3 बदल जाहीर केले आहेत. हे बदल जन धन योजना, मृत खातेधारकांचे दावे आणि गुंतवणूकीशी संबंधित आहेत. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हे बदल करण्यात आले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदी SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन लष्करी संघर्षानंतर मोदींचा हा पहिला चीन दौरा असेल.
CDS (कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेद्वारे इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), नेव्हल अकादमी (INA) आणि एअर फोर्स अकादमी (AFA) मध्ये महिलांचा समावेश न करण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील कर्तव्य पथावरील कर्तव्य भवन-०३ इमारतीचे उद्घाटन केले. ही इमारत २०१९ मध्ये सुरू झालेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे आणि कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट (CSS) च्या १० इमारतींपैकी पहिली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला “डेड इकॉनॉमी” म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून, जागतिक विकासात भारताचे योगदान अमेरिकेपेक्षा अधिक आहे.
मोदीविरोधात आंधळे झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये परदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप होत आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लादायची हिमाकत केली. चीनवर दादागिरी करता येत नाही म्हणून त्यांनी भारतावर दादागिरी करून पाहिली.
जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. दुपारी 1:12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चीनवर करता येईना म्हणून ट्रम्प यांची भारतावर दादागिरी; आयात – निर्यातीच्या वस्तूंवर 50 % tariff लादणी!!, असला प्रकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सायंकाळी केला.
दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना डमी बॉम्ब सापडला नाही. यानंतर कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलसह सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली. दिल्ली पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App