देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी कुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले, तर कुंभमेळा विनाकारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लालू म्हणाले ”कुंभ म्हणजे काय? फालतू आहे कुंभ.”
महाराष्ट्रात love jihad विरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केल्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांच्या नेत्यांनी आगपाखड केली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले. यासोबतच त्यांनी जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली.
कर्नाटकातील बेळगावमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे गोव्याच्या एका माजी आमदाराला रिक्षा चालकाने मारहाण केली आणि घटनेनंतर काही वेळातच माजी आमदाराचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी नवीन आयकर विधेयकासाठी ३१ सदस्यांची निवड समिती स्थापन केली. भाजप खासदार आणि ओडिशातील केंद्रपाडा येथील खासदार बैजयंत पांडा यांना अध्यक्ष बनवण्यात आले आहे. समितीला पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी अहवाल सादर करावा लागेल.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, भारताचे सरन्यायाधीश सीबीआय संचालक किंवा इतर उच्च अधिकाऱ्यांच्या (मुख्य निवडणूक आयुक्त) निवड समितीत कसे सहभागी होऊ शकतात. न्यायालयीन सक्रियता आणि अतिक्रमण यांच्यातील रेषा पातळ आहे, परंतु लोकशाहीवर त्याचा परिणाम जास्त आहे.
भारत स्वतःच्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या एएमसीए प्रकल्पावर काम करत आहे, जे २-३ वर्षांत पूर्ण होईल. रशियानेही हे लढाऊ विमान भारताला विकण्याची ऑफर दिली आहे.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Mahakumbha शनिवारी रात्री ९:२६ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १४ महिला आणि ३ मुले […]
गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार मिळणेही अवघड झाले आहे. काँग्रेसच्या तब्बल २१५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच आता, शनिवारी रात्री राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही अशीच घटना घडली.
मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी बँकेचे महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध १२२ कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या अपहार प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून (EOW) केली जाईल.
जगातल्या काही विशिष्ट उदाहरणांवरून सगळी जागतिक लोकशाहीच धोक्यात आल्याच्या बाता मारणाऱ्या युरोपला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खडे बोल सुनावले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमधील नऊ ठिकाणी आणि हरियाणातील हिसारमधील दोन ठिकाणी छापे टाकले. सायबर गुन्ह्यांशी संबंधित तपासाअंतर्गत सीबीआयने ही छापेमारी केली आहे.
१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. तर टीम इंडिया आपले सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळणार आहे. दरम्यान, शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुबईला रवाना झाली आहे.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर, भाजप आता दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) देखील सरकार स्थापन करू शकते. शनिवारी आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज आपल्या घराच्या प्रांगणातच चायनामेड ड्रोनशी खेळले. त्यांनी त्यातले तंत्रज्ञान भारतीयांना “शिकवले.
महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या कायद्याद्वारे लोक लव्ह जिहादच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांपासून वाचतील असा राज्य सरकारचा विश्वास आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी सरकारचे हे पाऊल स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे म्हटले.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या सर्वोच्च संघटनेत पहिला मोठा फेरबदल करताना, काँग्रेसने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
मध्य प्रदेश सरकारने राज्यातील १९ पवित्र ठिकाणी दारूबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. १ एप्रिलपासून या भागातील दारूची दुकाने बंद राहतील. यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे दहशतवाद आणि खोऱ्यातील दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यांनी तीन सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाकुंभमेळ्याचा आज ३४ वा दिवस आहे. यावेळी महाकुंभात अनेक नवीन विक्रम झाले आहेत. महाकुंभमेळ्यादरम्यान आतापर्यंत ५० कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. यानंतर महाकुंभात आणखी एक विक्रम झाला आहे. जगभरातून लाखो भाविक महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महाकुंभात ६० कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रामध्ये love jihad विरोधातला कायदा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने नुसती समिती स्थापन केली, तर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी त्यावर लगेच आगपाखड केली.
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोचा वाद वाढत चालला आहे. दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत इंडियाज गॉट लेटेंटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा कार्यक्रमांमधून दाखवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि अश्लील मजकुरावर चर्चा झाली.
संसदेत सादर केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालात असे दिसून आले आहे की देशातील राष्ट्रीय महत्त्वाची सुमारे 280 स्मारके वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील बहुतेक स्मारके राजधानी दिल्लीत आहेत.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार जाऊन नवे भाजपचे सरकार येण्यापूर्वीच केजरीवाल अडचणीत आले त्यांनी बांधलेला शीश महल (CVC) Central vigilance commission अर्थात केंद्रीय दक्षता समितीच्या चौकशीत अडकला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App