पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान ते इटानगरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांसह ₹५,१०० कोटींच्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करतील. त्यानंतर, पंतप्रधान मोदी त्रिपुरातील ५२४ वर्षे जुन्या माता त्रिपुरा सुंदरी मंदिराला भेट देतील, जिथे ते पुनर्विकसित कॅम्पसचे उद्घाटन करतील. पंतप्रधानांनी स्वतः X वर पोस्ट करून याची घोषणा केली.
आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित केले. ते म्हणाले, “२२ सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल. समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होईल.” पंतप्रधानांनी जनतेला फक्त देशवासीयांच्या कठोर परिश्रमातून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सर्वसामान्यांना हवेत ते मुद्दे जोरावर आणि विरोधकांचे मुद्दे वाऱ्यावर असाच प्रकार घडला. न
२०२२ पासून अतिरेकी निधी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा काश्मिरी फुटीरतावादी नेता यासीन मलिकने दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्याने दावा केला आहे की १९९० ते २००६ पर्यंत सात सरकारांनी त्याला काश्मीर चर्चा आणि शांतता प्रक्रियेत सहभागी करून घेतले.
GST Reforms संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केलेल्या भाषणाचे अखिल भारतीय व्यापार महासंघाने स्वागत करून केंद्र सरकारने घोषित केलेल्या जीएसटी कपातीचा लाभ सर्व वर्गांना देण्याचे आश्वासन दिले
हिमाचल प्रदेशात मान्सून सुरू झाल्यापासून, ४६ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे ९८ पूर आणि १४६ भूस्खलन झाले आहेत. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळ आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर यांना “आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यांमुळे दहशतवाद्यांना परावृत्त केले आहे. आता, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन खैबर पख्तूनख्वामध्ये नवीन तळ स्थापन करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घ्यावी यासाठी डोळे लावून बसलेल्या विरोधकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वेगळ्या प्रकारे चपराक हाणली.
विशेष प्रतिनिधी दिल्ली : Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 21 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या भाषणाचा […]
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आता आम आदमी पक्षाने (आप) निवडणूक आयोगावर मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान कापल्याचा दावा केला.
भारतीय हवाई दलाचा कणा मानले जाणारे मिग-२१ विमान २६ सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहे. ६२ वर्षांच्या सेवेत त्यांनी १९७१ च्या युद्धात, कारगिलमध्ये आणि इतर अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, भारत वैश्विक बंधुत्वाच्या भावनेने पुढे जात आहे. जगात आपले कोणीही शत्रू नाहीत. प्रत्यक्षात, जर आपला शत्रू असेल तर तो इतर देशांवरील आपले अवलंबित्व आहे. हा आपला शत्रू आहे. भारताच्या या शत्रूला पराभूत करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.
झारखंडमध्ये कुडमी समुदायाने शनिवारी निदर्शने केली. अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रेल टेका आंदोलन केले.राज्यातील ४० रेल्वे स्थानकांवर निदर्शने सुरूच होती. पारंपारिक पोशाख परिधान करून आणि ढोल-ताशांसह निदर्शक सकाळपासूनच रेल्वे रुळांवर उतरले.
सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांनी शनिवारी सांगितले की, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकाराचा वापर नम्रतेने आणि जबाबदारीने करावा.दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) २०२५ च्या १० व्या अखिल भारतीय परिषदेत सरन्यायाधीश बोलत होते, ज्यामध्ये देशभरातील न्यायाधीश आणि न्यायाधिकरण सदस्य उपस्थित होते. सरन्यायाधीश म्हणाले, आपल्याकडे प्रचंड शक्ती आहे, परंतु तिचा योग्य वापर केला पाहिजे. आपल्यासमोर येणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांना विश्वास आहे की त्यांना न्याय मिळेल, म्हणून आपले निर्णय निष्पक्ष असले पाहिजेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मतदार यादीत छेडछाड झाल्याचा गाजावाजा करत निवडणूक आयोगावर आरोप केले.
निवडणूक आयोगाने सहा वर्षांत एकही निवडणूक न लढवलेल्या तब्बल 474 पक्षांची नोंदणी रद्द केली असून आणखी 359 पक्ष रडारवर आहेत.
सध्या भारतात “दुबळे” पंतप्रधान; तर मग यासीन मलिकला हाफिज सईदच्या भेटीला पाकिस्तानात पाठवणारे पंतप्रधान “बळकट” होते का??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आली.
अमेरिकेच्या न्याय विभाग आणि न्यू जर्सी जिल्ह्याने न्यू जर्सीमधील BAPS मंदिराचा तपास बंद केला आहे. मंदिरावर कामगारांचे शोषण आणि मानवी तस्करीचा आरोप होता. मंदिराच्या बांधकामादरम्यान कामगारांना प्रति तास फक्त $1.20 वेतन देण्यात आले होते असाही आरोप करण्यात आला होता.
बरेली येथील अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणाले, “मुस्लिमांनी मोदी आणि योगी यांच्यावरील चित्रपट पाहू नये. मुस्लिमांनी चित्रपट पाहणे बेकायदेशीर आहे आणि शरिया कायद्यानुसार निषिद्ध आहे. जो कोणी ते पाहतो तो दोषी ठरेल.”
बरेली येथील इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (आयएमसी) चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी एक वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, “शहाजहांपूरमध्ये पैगंबरांच्या सन्मानाचा अपमान करण्यात आला. मुस्लिमांवरील हल्ल्यांविरुद्ध सरकारने किंवा सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही कारवाई केली नाही. हे देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचे षड्यंत्र आहे.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे १९६५ च्या युद्धाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी गेल्या सहा वर्षांत कोणतीही निवडणूक न लढवलेल्या ४७४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची यादी रद्द केली. या कारवाईनंतर, गेल्या दोन महिन्यांत ८०८ पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे. आयोगाने असेही म्हटले आहे की, ९ ऑगस्ट रोजी ३३४ पक्षांची नोंदणी यापूर्वी रद्द करण्यात आली होती.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये 17 सप्टेंबरला एक महत्वपूर्ण सैन्य करार झाला. दोन्ही दोन्ही देशांनी स्ट्रॅटेजिक म्यूचुअल डिफेंस एग्रीमेंट (SMDA) असे या कराराला नाव दिले. हा करार म्हणजे इस्लामिक नाटोची सुरुवात असल्याचे बोलले गेले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App